Panipat Collection : बॉक्सऑफिसवर इतकी कमाई

225

मुंबई : बहुचर्चित आणि कॉन्ट्रॉवर्सीने घेरलेला सिनेमा ‘पानिपत’ अखेर बॉक्सऑफिसवर आपला करिश्मा दाखवत आहे. ‘पानिपत’च्या तिसऱ्या युद्धाचा हा थरारक आणि रोमांचक इतिहास अत्यंत कल्पकतेने आणि हुशारीने आशुतोषने या चित्रपटाद्वारे मांडला आहे. मराठ्यांची ही शौर्यगाथा सदाशिवराव पेशवे यांची पत्नी पार्वतीबाई यांच्या नजरेतून ‘पानिपत’ या चित्रपटात मांडण्यात आली आहे. सदाशिवरावभाऊंची भूमिका साकारणाऱ्या अर्जुनवर प्रचंड टीका झाली. मात्र उत्तम अभिनयासह त्याने बॉक्सऑफिसवर कमाल केली.

सलग आठव्या दिवशीही ‘पानिपत’ ने बक्कळ कमाई केली आहे आणि इतर चित्रपटांना जबरदस्त टक्कर दिली आहे.

पहिल्या दिवशी या चित्रपटाने 4.12 कोटींची कमाई केली आहे. तर, आठव्या दिवशी ‘पानिपत’ ने जवळपास 27 कोटींचा पल्ला गाठला आहे. माहाराष्ट्रात चित्रपटाने चांगली कमाई केली असली तरी मात्र दिल्ली, युपी, राजस्थान या राज्यांत कमाईत मागे आहे.

‘पानिपत’ ला चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि चित्रपटाचे चांगले रिव्ह्युही समोर आले. कार्तिक आर्यन, भूमी पेडणेकर आणि अनाया पांडे यांच्या ‘पती पत्नी और वो’ या चित्रपटाला पानिपतने चांगली टक्कर दिली. शिवाय नुकताच ‘मर्दानी 2’ प्रर्दशित होऊनही पानिपतने कमाई कायम ठेवली आहे.