LONIKALBHOR CRIME | अनोळखी महिलेच्या खुनाचा लोणी काळभोर पोलीसांनी लावला छडा

1108

लोणी काळभोर |लोणी काळभोर पोलीस स्टेशन हददीत थेऊर येथे  दि.०५/०७/२०२२ रोजी चिंतामणी हायस्कुल समोरील मैदानाशेजारी यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या पडीक जागेत एक अनोळखी महिला वय अंदाजे २० ते २५ वर्षे हिचा खुन झाल्याचे निष्पन्न झाले असल्याने या  महिलेस ओळखणारे कोणीही नसल्याने या  महिलेचा अज्ञात आरोपीने  डोक्यात दगड घालुन खुन केला असल्याचा त्याबाबत गुन्हा  लोणी काळभोर पोलीस ठाणे  दाखल करण्यात आला होता.

या  गुन्हयातील मयत अनोळखी महिलाच्या बाबत कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध नसताना  तिची ओळख पटविण्याचे तसेच आरोपीचा शोध घेण्यासाठी  नम्रता पाटील  पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ०५ पुणे शहर ,बजरंग देसाई, सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग पुणे शहर ,यांच्या  मार्गदर्शनाखाली व  सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक  राजेन्द्र मोकाशी यांनी तपास पथकास सुचना देवुन आरोपीचा शोध घेणे बाबत आदेश दिला .त्याप्रमाणे तांत्रिक विश्लेषणाच्या  आधारे  मयत महिलेचा  शोध लोणी काळभोर पोलिसांनी घेतला .

मयत महिलेचे नाव वैशाली लाडप्पा दुधवाले, रा. भिमा कोरेगाव, शिरुर, पुणे व मुळगाव रा. चिवरी, उमरगा, ता. तुळजापुर, उस्मानाबाद सध्या रा. असे असुन  महिलेच्या  नातेवाईकाचा शोध घेवून त्यांच्या कडे अधिक तपास केला असता या  महिलेचे एका इसमा सोबत प्रेमसंबंध असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरुन पोलीसांनी तपास करून   तिचा प्रियकर  महेश पंडित चौगुले, वय-२४ वर्षे, रा. तळेगाव दाभाडे, पुणे मुळगाव रा. चिवरी, उमरगा, तुळजापुर, उस्मानाबाद यास तळेगाव दाभाडे पुणे परिसरातुन ताब्यात घेतले व त्याच्याकडे  अधिक चौकशी केली असता त्यांने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली परंतु त्याच्याकडे अधिक सखोल तपास केला असता आरोपीने  महिला वैशाली लाडप्पा दुधवाले हिचे सोबत प्रेमसंबंध असल्याचे सांगुन मयत महिला वैशाली हिचा चारित्र्याचा संशयावरुन डोक्यात दगड मारुन खुन केला असल्याचे कबुली दिली.आरोपीस अटक करण्यात आली असुन त्याला  न्यायालयात हजर केले असता त्यास   ०६ दिवसांची पोलीस कस्टडी दिली   पुढील तपास सुभाष काळे पोलीस निरीक्षक  (गुन्हे) हे करीत आहेत.

दि.०५/०७/२०२२ रोजी पासुन सदर मयत महिला हिची ओळख पटविण्याबाबत पोलीसांनी अनेक प्रयत्न केले होते. परंतु त्यात यश येत नव्हते. सदर गुन्हयात कसलाही धागादोरा नसताना मयत महिला व आरोपी याचा थेऊर परिसराशी कसलाही संबंध नसताना पोलीसांनी कौशल्याने हा  तपास करुन गुन्हा उघडकीस आणला

ही  कामगिरी अमिताभ गुप्ता पोलीस आयुक्त पुणे शहर,  संदिप कर्णिक  सहाय्यक पोलीस  आयुक्त पुणे शहर  , नामदेव चव्हाण  अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशीक विभाग  पुणे शहर,  नम्रता पाटील  पोलीस उप-आयुक्त परिमंडळ- ०५,  बजरंग देसाई, सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग, राजेन्द्र मोकाशी वरिष्ठ पोलीस निरीक्षक ,सुभाष काळे पोलिस निरिक्षक  (गुन्हे), यांच्या  मार्गदर्शनाखाली  पोलीस उप निरीक्षक अमित गोरे, पोलिस हवालदार  नितीन गायकवाड, संतोष होले, आनंद पाटोळे, पोलिस नाईक  श्रीनाथ जाधव, संभाजी देविकर, अमित साळुंखे, पोलिस शिपाई  गणेश भापकर, राजेश दराडे, बाजीराव विर, शैलेश कुदळे, निखील पवार, दिपक सोनवणे, मल्हारी ढमढेरे, विश्रांती फणसे यांच्या पथकाने केली आहे.