चाकण येथील मेरेथोन स्पर्धेची उत्साहात सांगता

235

चाकण : ज्ञानवर्धिनी विद्यालय, भामा इंग्लिश मेडीयम स्कूल व ज्ञानवर्धिनी ज्युनियर कॉलेज चाकण यांच्या संयुक्त विद्यमाने चाकण येथे गेल्या तीन दिवसांपासून आयोजित करण्यात आलेल्या मेरेथोन स्पर्धेची उत्साहात सांगता करण्यात आली. या मॅरेथॉन स्पर्धेत सहाशे हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता.

या स्पर्धेचे उदघाटन आयर्न मॅन विराज परदेशी व पुणे मॅरेथॉन महिला विजेती उर्वी तांबे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चाकण नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष प्रकाश गोरे, शिवसेना महिला आघाडीच्या खेड तालुका प्रमुख नंदा कड, महिला आघाडीच्या चाकण शहर प्रमुख विजया जाधव, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख शिवाजी वरपे, तालुका प्रमुख प्रकाश वाडेकर, चाकण शहरप्रमुख महेश शेवकरी, उद्योजक दत्तात्रय गोरे, संस्थेचे अध्यक्ष विकास गोरे, संचालक विष्णू गोरे, नितीन गोरे, खेड बाजार समिती माजी संचालक बाळासाहेब गोरे, काळूराम कड, योगेश गोरे, राकेश पटेल, ज्ञानवर्धिनी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रमिला गोरे, दत्तात्रय लिंभोरे, भामा स्कूलच्या मुख्याध्यापिका माधुरी गोरे, विवेक शिंदे, ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख सचिन देठे, प्रा. अण्णासाहेब कोडग, संचालिका मनीषा गोरे, वर्षा दरेकर, सविता गोरे, अनिता गोरे, आशा गोरे, वंदना गीते, शांताबाई गोरे, संगीता गोरे, वर्षा राजपूत, संध्या गोरे, राणी गोरे व सर्व शिक्षक सहकारी,  शिक्षेकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व सहभागी शाळा, प्रतिनिधी विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

यावेळी योगावरील प्रात्यक्षिक राम सांडभोर यांनी करून दाखविले. तर रक्तदान संकलन  करण्याकरिता डॉ. चंद्रकांत हिवरकर यांनी सहकार्य केले. मेरेथोन स्पर्धेचे बक्षीस वितरण खेड तालुक्याचे आमदार सुरेश गोरे यांच्या हस्ते झाले.

या मॅरॅथॉन स्पर्धेमध्ये महिला विजेत्या योगिता राठोड, रोहिणी जाधव व किरण वाघमारे यांना, तर पुरुष विभाग मध्ये रितेश यादव, दशरथ भोगते, मारुती मंगरुळे व शंकर नवले तसेच क्रीडा स्पर्धे मध्ये मुले कबड्डी विजेते भामा स्कूल, खो – खो मुली व मुले विजेते भोसे शाळा, कब्बडी मुली विजेते भोसे शाळा, क्रिकेट विजेते ज्ञानवर्धिनी कॉलेज यांना बक्षीस देण्यात आले.

यावेळी आमदार सुरेश गोरे यांनी खेळाडू यांच्या गुणवत्तेचे कौतुक केले. खेळाचे आपल्या जीवनातील महत्व तसेच विद्यार्थी यांनी शिक्षणा बरोबर खेळामधून नाविन्य गोष्टी आत्मसात करता येतात. व भविष्यात आपले करियर खेळाच्या माध्यमातून घडू शकते, असे सांगितले. हर्षाली गोरे यांनी सूत्रसंचलन केले. मुख्यध्यापक प्रमिला गोरे यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेवून आभार मानले.