Chiplun News | आमदार शेखर निकम यांच्या शुभहस्ते पाली ग्रामपंचायतचे उदघाटन संपन्न

84

चिपळूण | विलास गुरव

आमदार शेखरजी निकम सर यांच्या प्रयत्नातून पाली ग्रामपंचायत साठी जनसुविधा योजनेतून तब्बल १६ लाख निधी मंजूर झाला होता आमदार शेखरजी निकम यांचे प्रमुख उपस्थितीत उदघाटन पार पडले. सरपंच अजय महाडिक यांनी मनापासून गावच्या वतीने आभार मानले.

सर आमदार झाल्यानंतर पहिला निधी आमच्या ग्रामपंचायत देण्याचे कबूल केले होते आणि शब्दही पूर्ण केला आमदार साहेबाच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष रखडलेला स्मशानभूमी रस्ता हि पूर्ण त्याबद्दल देखील कौतुक केले.

पाली गावाला ग्रामपंचायत नसल्याने कुठे बसायचे याची समस्या होती त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये सभांचे व कार्यालयीन कामकाज चालू असायचे.

शेखरजी निकम म्हणाले कि, माझ्या राजकीय कारकिर्दीतील हि सुसज्ज इमारत कायमस्वरूपी लक्षात राहील सरपंच महाडिक यांनी नियोजनबद्ध ग्रामपंचायतीचे काम केले त्याबद्दल कौतुक केले.

या उदघाटन सोहळ्यासाठी आमदार शेखर निकम, जिल्हा परिषद सदस्य दीप्ती महाडिक , पंचायत समिती सदस्य नितीन ठसाळे, ऋतुजा पवार , दशरथ दाभोलकर ,सरपंच अजय महाडिक, नंदकुमार महाडिक, विलास महाडिक, सचिन गमरे, सीताराम घाडगे, बावा सुर्वे, राजू शिंदे, सचिन शिंदे, राजेंद्र महाडिक, पूनम गमरे , अर्पिता महाडिक, विकास मोहिते, प्रमोद सुर्वे, सुभाष महाडिक, सूर्यकांत महाडिक, प्रमोद महाडिक, महादेव महाडिक , दिलीप महाडिक ,उमेश मोहिते , रुपेश घाग , महादेव महाडिक , दिपक खेडेकर ,भार्गव महाडिक ,रवींद्र आयरे , विकास गमरे , दिलीप नळकांडे ,शीतल नलावडे ,जयवंत अदावडे , पांडुरंग पिलांवरे , रघुनाथ महाडिक ,नितीन गमरे , अशोक साळवी रामसेविका स्वप्नाली चांदे आदी मान्यवर उपस्थित होते.