माणिकबाग येथे आढळला तरुणीचा मृतदेह, परिसरात खळबळ

195

पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील माणिकबाग येथील सोसायटीत एका तरुणीचा मृतदेह आढळून आल्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तेजसा श्यामराव पायाळ असे मृत तरुणीचे नाव आहे. २६ वर्षीय तेजसा माणिकबागमध्येच राहत होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजसा श्यामराव पायाळ ही माणिकबागेतील राधाकृष्ण सोसायटीमध्ये कुटुंबासोबत राहत होती. ती मूळची बीड येथील असून तिने एमबीएचे शिक्षण घेतले होते. हिंजवडी येथील एका कंपनीत ती कामाला होती. तिचे आई वडील गावी गेले होते. त्यांच्यासोबत तीदेखील गेली होती. मात्र चार पाच दिवसांपूर्वी पुण्यात घरी आली होती. मागील दोन तीन दिवसांपासून तिचा फोन लागत नव्हता. तिच्या आईने घरी आल्यावर पाहिले असता. घरात मृतदेह आढळून आला.

मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाख करुन घेतला आहे. सिंहगड पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.