प्रेयसीचा पती घरी येताच चौथ्या मजल्यावर तो विवस्त्र लटकला; अन्…

357

सोशल मीडियावर चार दिवसांपासून एक व्हिडिओ प्रचंड धुमाकूळ घालतोय. अवघ्या १० सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये एक नग्न व्यक्ती एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील खिडकीला लटकलेला दिसतोय. या व्यक्तीचे एका विवाहीत महिलेसोबत अनैतिक संबंध होते असं सांगितलं जातंय. तिला भेटण्यासाठी हा व्यक्ती तिच्या घरी गेला होता. पण त्याचवेळी तिचा पती घरी आला आणि याची चांगलीच पंचाईत झाली.

‘द सन’च्या वृत्तानुसार, हा व्हिडिओ चीनमधील असल्याचं सांगितलं जात आहे. ३० नोव्हेंबर रोजी हा व्हिडिओ ट्विटरवर अपलोड करण्यात आला होता. तेव्हापासून व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. प्रेयसीचा पती घरी येताच हा व्यक्ती चौथ्या मजल्यावरील खिडकीच्या बाहेर नग्नावस्थेत लटकलेला दिसतो. पण, काही क्षणांतच पकड सैल झाल्यामुळे हा व्यक्ती खाली कोसळतो. सुदैवाने जमिनीवरील कचऱ्याच्या डब्ब्यावर हा व्यक्ती कोसळताना व्हिडिओमध्ये दिसतोय. तर रस्त्यावरील नागरिकांचा ओरडण्याचा आवाजही ऐकू येत आहे. काही ऑनलाइन रिपोर्ट्सनुसार, खाली कोसळल्याने हा इसम गंभीर जखमी झाला असला तरी त्याचा जीव मात्र वाचलाय