मनुष्य कुरूप नाही तर गरीब असतो हे सिद्ध केले या ४ बॉलीवूड कलाकाराने !

180

बॉलिवूड विश्वात असे अनेक हिरो-हिरोइन आहेत, जे या इंडस्ट्रीत येण्याआधी कुरूप दिसायचे. पण बॉलिवूडमध्ये आल्यावर त्याचे भाग्यच उजळून गेले. आज ते हँडसम आणि स्मार्ट दिसत आहेत. चला तर जाणून घेऊया, अश्याच काही स्टार्स बद्दल.

१) रेमो डिसुझा

रेमो डिसुझा हे भारतीय डान्सर, नृत्य दिग्दर्शक, अभिनेता, आणि चित्रपट निर्देशक आहे. खासकरून रेमो आपल्याला नृत्य क्षेत्रात व त्या संबधित कार्यक्रमात जास्त दिसतात. त्याचे बंगाली सिनेमा इंडस्ट्रीत विशेष योगदान आहे. त्यांनी “डान्स इंडिया डान्स” या रिअँलिटी कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. परंतु स्टार बनायच्याआधी ते दिसायला कुरूप होते. पण नंतर सेलिब्रेटी झाल्यावर हँडसम आणि स्मार्ट दिसू लागले. आज या बॉलिवूड इंडस्ट्रीतील नामवंत डान्सर आहेत. आणि चाहते त्यांना पाहायला, भेटायला अक्षरशः जीवाचे रान करतात.

२) नेहा कक्कड

या यादीत दुसरे नाव प्रसिद्ध गायिका नेहा कक्कड यांचे येते. नेहा कक्कड एक भारतीय पार्श्वगायिका आहेत. यांनी बॉलिवूडमधील अनेक चित्रपटात गाणे गायले आहेत. २००६ साली नेहा ‘इंडियन आयडॉल सीजन २’ मध्ये स्पर्धक होत्या. या कार्यक्रमात एकापेक्षा एक सादरीकरणाने त्यांनी परीक्षकांचे मन जिंकलेले. “सन्नी सन्नी”, “मनाली ट्रेंस”, “आओ राजा”, “धतिंग नाच”, “लंदन ठुमकदा” आणि “जादू की झप्पी”,”दिलबर” इत्यादी गाणे त्यांच्या नावावर हिट आहे. स्टार सेलिब्रेटी बनण्याआधी त्यांचा रंग सावळा होता. स्टार सेलिब्रेटी बनल्यानंतर त्यांच्यात भरपूर बदल झाला. आणि त्यांच्या जादुई आवाजामुळे रातोरात त्यांना चाहत्यांच्या हृदयात स्थान मिळाले. आज त्या अनेक हिंदी रिअँलिटी कार्यक्रमाचे परीक्षक आहेत.

३) हिमेश रेशमिया

हिमेश रेशमिया हे गायक, संगीतकार, अभिनेता आणि चित्रपट निर्माता आहे, हिमेश विशेषतः हिंदी चित्रपटासाठी गाणे गातात. जेव्हा ते या इंडस्ट्रीत आले तेव्हा ते दिसण्यास एवढे खास नव्हते. पण आज स्टार सेलिब्रेटी झाल्यावर ते हँडसम आणि स्मार्ट दिसतात. अनेक चित्रपटात त्यांनी अभिनेत्याची भूमिका बजावली आहे. “आशिक बनाया आपसे”, “तेरा सूरूर”, “जरा झूम झूम”, “झलक दिखलाजा “, “अंदाज अपना अपना”, “शकलाका बूम बूम”, “हुक्का बार”, अशी अनेक लोकप्रिय गाणी आहेत. “चलाओ ना नैनो से” असे अनेक हिट गाणे या बॉलिवूड इंडस्ट्री ला दिले. आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरूवात त्यांनी “आप का सुरुरु” या चित्रपटातून केली.

४) नवाज़ुद्दीन सिद्दीक़ी

नवाज़ुद्दीन सिद्दीक़ी हे एका गरीब घरातील हुशार, मेहनती असे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी अपार मेहनतीच्या आधारावर गरिबीवर मात दिली. त्यांना बॉलिवूडमध्ये स्वतः चे स्थान निर्माण करण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. आम्ही आपणास सांगू इच्छितो, कि स्टार बनण्याआधी नवाज़ुद्दीन रंगाने दिसायला काळे होते. स्टार बनल्यानंतर त्यांच्या दिसण्यात प्रचंड बदल झालेला आहे. आज बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेता मानले जातात. त्याचबरोबर नेटफ्लिक्सवरील एका प्रसिद्ध “sacred games” वेबसिरीजत केलेल्या कामामुळे चाहत्यांची चांगलीच दाद मिळालेली आहे. म्हणून हि स्टार्स मंडळी जरी दिसायला कुरूप होते. त्यांच्या अथांग मेहनतीवृत्तीमुळे त्यांचा रंगच नाही, तर भाग्य सुद्धा उजळले. म्हणून गरिबी श्रीमंतीत बदलायची असेल तर मेहनतीला पर्याय नाही. असेच मनोरंजन क्षेत्रातील नवीन माहिती जाणून घेण्यासाठी लेखाला लाइक, कमेंट आणि शेअर करायला विसरु नका.