पिनकोड नंबरचा अर्थ काय? आपण पिनकोड का लिहितो समजून घ्या !

227

आपण दैनंदिन जीवनात पत्ता लिहायचा झाल्यास पिनकोड नंबर लिहितोच. आपण आपसूकच पत्ता लिहिताना पिनकोड लिहतो. एक आपल्याला ती सवय झालेली आहे. प्रत्येक शहराचा पिनकोड नंबर हा वेगवेगळा असतो. मोठ्या शहरातील वेगवेगळ्या ठिकाणांचा पिनकोड नंबर वेगळा असतो. पिनकोड मध्ये 6 अंक असतात. आपल्याला अनेकदा प्रश्न पडतो पिनकोड नंबरचा नेमका अर्थ काय? हा लिहिणे का गरजेचे आहे ? पिनकोड क्रमांक कधी अस्तित्वात आला या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

एक काळ होता ज्या काळी पत्राद्वारे एकमेकांना संदेश पाठवले जात असत पण आज डिजिटल युग अवतरले आहे. या युगात कॉल व्हिडिओ मेसेज याद्वारे थेट संपर्क करता येतो. अधिकृत संदेश पाठवण्याकरिता ई-मेलचा वापर केला जातो. ज्यांनी एकमेकांना पत्र पाठवले आहेत. पत्राद्वारे संवाद साधला आहे. त्यांच्यासाठी पत्राचा संवाद हा कायमच मनातील कोपऱ्यात स्थान निर्माण करणारा होता. पोस्टमन काका घरी येऊन पत्र टाकून जायचे मग ते पत्र कोणाचे कोणी लिहिले ह्या सर्व चर्चा घरात व्हायच्या. दुसऱ्याचे पत्रे वाचू नये हा अलिखित नियमच होता पण हे पत्र पिनकोड मुळेच पोहोचले जात असे.

कोणतेही पत्र पाठवण्याकरिता पिनकोडची आवश्यकता असते. मनीऑर्डर कुरियर पाठवण्याकरिता ही पिनकोड लागतो. डिजिटल युगात पिनकोड चे महत्त्व तसे कमी होत चालले असले तरी अनेक सेवा ज्या पोस्टवर अवलंबून आहेत त्यांना पिनकोड महत्त्वाचा असणार आहे. पिनकोड हा एक खूपच खास नंबर असतो ज्याच्यावर पुर्ण पोस्टल सिस्टीम अवलंबून असते. भारतीय पोस्ट विभागाने सत्तरच्या दशकात पिनकोड ची सुरुवात केली. पिन कोड ची सुरुवात 15 ऑगस्ट 1972 रोजी केली गेली.

पिनकोड चा अर्थ पिनकोड द्वारे कार्य कसे होते.

पोस्टल इंडेक्स नंबर असा पिनकोड चा अर्थ होतो. ई-मेल मुळे पत्र पाठवणे कमी झाले आहे. मात्र कुरियर सर्विस मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने पिनकोड चे महत्व आज वाढत आहे. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट यांसारख्या ऑनलाईन खरेदी-विक्री वेबसाईट आज तुमच्या घरी पार्सल पाठवू शकतात याचं कारण पिनकोड आहे. खरेतर पिनकोड हा खूपच महत्त्वाचा नंबर असतो 6 अंकांना एकत्र करून बनवलेला तुमच्या परिसराची संपूर्ण माहिती देतो. तुमच्या माहिती करता आपला देश 6 पोस्टल झोनमध्ये विभागण्यात आलेला आहे. यात रिजनल झोन आणि फंक्शनल झोन आहेत. त्यामुळे पिनकोड कुठल्या ना कुठल्या खास झोनची माहिती देतो.

जर पिनकोड चा पहिला क्रमांक 1 असल्यास याचा अर्थ हा पिनकोड दिल्ली हरियाणा पंजाब हिमाचल प्रदेश किंवा जम्मू आणि काश्मिर या राज्यांपैकी एक आहे. पिनकोडचा पहिला क्रमांक 2 उत्तर प्रदेश उत्तराखंड या राज्यासाठी आहे. पहिला क्रमांक 3 राजस्थान गुजरातसाठी आहे. 4 अंक हा महाराष्ट्र मध्यप्रदेश आणि छत्तीसगडसाठी आहे. पहिला क्रमांक 5 असल्यास आंध्र प्रदेश कर्नाटक या राज्यांशी संबंधित पिनकोड आहे. सुरुवातीला सहा क्रमांक केरळ,तमिळनाडू राज्याचा आहे. आणि 7 क्रमांक इस्टर्न झोन करिता आहे. जमाते पश्चिम बंगाल आणि ईशान्यकडील राज्यांचा समावेश होतो. 8 क्रमांक सुरुवातीस असल्यास बिहार आणि झारखंड यांच्याशी तो संबंधित आहे. 9 क्रमांकाने सुरु होणारा पिनकोड आर्मी पोस्टल सर्विस साठी वापरण्यात येतो.