आता खवय्येगिरी घरोघरी

167

असं म्हणतात कि माणसाच्या हृदयाचा रास्ता त्याच्या पोटातून जातो. त्यामुळे चमचमीत पदार्थांनी सगळ्यांना तृप्त करण्याच्या प्रयत्नात गृहिणी असतात. रोज रोज नवीन आणि वेगळं काय करायचं? यासाठी त्या विविध माध्यमं शोधत असतात. या सुगरणींची मदत झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘आम्ही सारे खवय्ये’ नित्य नियमाने करत आहे. आम्ही सारे खवय्येचा हा लज्जतदार प्रवास ३२८० भागांचा झाला.

या यशस्वी प्रवासानंतर आम्ही सारे खवय्ये आता एका नव्या पर्वासोबत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आता हि खवय्येगिरी घरोघरी होणार आहे. निवेदक संकर्षण कऱ्हाडे आता लाडक्या प्रेक्षकांच्या घरी जाऊन त्यांच्या किचनमध्ये लज्जतदार पदार्थ बनवण्याचा बेत आखणार आहे. कुटुंबीय आणि संकर्षण यांच्यामध्ये खमंग पदार्थांसोबत गप्पा देखील रंगणार आहेत. त्यामुळे पाहायला विसरू नका आम्ही सारे खवय्येच हे नवीन पर्व फक्त आपल्या लाडक्या झी मराठीवर.