आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या नगरसेवकाचा मोक्का हटवला, पुणे पोलिसांना धक्का

127

पुणे  : वादग्रस्त नगरसेवक दीपक मानकर यांच्या अटकप्रकरणात पुणे पोलिसांना मोठा धक्का बसलाय. पुणे पोलिसांनी लावलेलं मोक्काचं कलम उच्च न्यायालयाने हटवलं आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे दीपक मानकर यांना जामीन मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. मानकर यांच्यावर गुंडगिरीचा आरोप कायम होत असतो. राजकीय पक्षात प्रवेश करून आपल्या गुन्हेगारी कृत्यांवर पांघरून खालण्याचे उद्योग मानकर करत असतात असा त्यांच्यावर आरोप होत असतो. जितेंद्र जगताप आत्महत्येप्रकरणी गेल्या दीड वर्षांपासून मानकर पुण्यातल्या येरवडा तुरुंगात होते. जितेंद्र जगताप हे मानकर यांचेच कार्यकर्ते होते. त्यांनी काही वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती.त्याआधी चिठ्ठी लिहून आत्महत्येला मानकरच जबाबदार आहेच असं जगताप यांनी लिहिलं होतं. त्यानंतर मानकर यांना अटक झाली होती. अटक करताना पोलिसांनी त्यांच्यावरुद्ध मोक्का लावला होता. त्याविरोधात मानकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने त्यांच्याविरुद्धचा मोक्का हटविण्याचा आदेश दिला. त्यामुळे त्यांना जामीन मिळायचा मार्ग मोकळा झालाय. मानकर हे गेले दीड वर्ष येरवडा कारागृहात होते.