सोनं इतकं महाग का बरं असतं ? चला तर मग जाणून घेऊया !

190

मित्रांनो तुम्ही सोन्या बद्दल खूप काही ऐकलं असेल. म्हणजे तुम्हाला हे ही माहिती असेल कि सोनं हे खूप महाग असतं आणि त्याच्या किमती रोज कमी जास्त होत असतात. त्याच्या किमती कितीही कमी झाल्या तरी त्याच्यावरचा सर्वात मौल्यवान धातू चा शिक्का काही पुसला जात नाही. आपल्या मराठीत एक वाक्य प्रचार सुद्धा आहे. वस्तू सोन्याच्या भावाने विकत घेणे. म्हणजे वस्तू एवढी महाग होती कि ती सोन्याच्या भावाने विकत घेतली. हा झाला अतिशयोक्ती अलंकार. सोन्याच्या भावाने कुठलीच वस्तू विकत घेतली जात नाही आणि भविष्यात असं होणं शक्य ही नाही. मग अश्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या सोन्या ला मौल्यवान बनवतात. जाणून घेऊया या लेखा मधे.

सर्वात पहिला आणि महत्वाचा मुद्दा जो ह्याला मौल्यवान बनवतो तो आहे भूगभशास्त्र. सोनं जगात कुठेही मिळू शकतं पण ते मिळणं खूप दुर्मिळ आहे. एवढं कि ओक वृक्षाच्या लाकडा पेक्षा ही जास्त दुर्मिळ. सोनं मिळवण्यासाठी सोन्याची खाण खणावी लागते आणि खाण खणायला भरपूर मनुष्यबळ आणि पैसा लागतो. मग त्या सोन्याला शुद्ध करून चांगला आकार द्यावा लागतो आणि ह्या मधेही भरपूर पैसा खर्च होतो. त्यामुळे सोनं महाग होतं.

बाकीचे असे धातू आहेत जे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत ते स्वस्त आहेत. पण असेही काही धातू आहेत जे सोन्या एवढेच दुर्मिळ आहेत. मग ते सोन्या एवढे महाग का नाहीत? उदाहरण द्यायचं झाल्यास Ruthinium ज्याची किंमत आज ९० हजार रुपये प्रति किलो आहे आणि १ किलो सोन्याची किंमत ३४ लाख रुपये आहे. एका वेबसाईट च्या आकडेवारीनुसार Ruthinium जगात ६ व्या नंबर चा दुर्मिळ धातू आहे आणि सोनं सातव्या नंबर चा. म्हणजेच Ruthinium हा धातू सोन्यापेक्षा ही दुर्मिळ आहे. यायचं अर्थ दुर्मिळ असणं ही एकच गोष्ट ह्या धातूला मौल्यवान बनवत नाही.

सोन्याचं अजून एक वौशिष्ट्य म्हणजे सोन्याला गंज चढत नाही आणि सोनं हे हाताळायला सोप्प असतं आणि सोन्याला कोणताही आकार देता येतो. काही धातूंना दुर्गंधी ही येते पण सोन्याला कधीच येत नाही. चांदी ला ही वितळवून कोणताही आकार देता येतो पण चांदी खराब होऊ शकते. पण सोनं कधीच खराब होत नाही. सोनं हा एक असा धातू आहे जो हजारो वर्ष एकाच आकारात राहून जराही बाधला जात नाही. पण सोनं हे १०० टक्के शुद्ध असावं लागतं बरं का! तुमच्याकडे सोनं असेल तर तुमच्या कडे धातू रूपात करन्सी आहे असे तुम्ही मानू शकता कारण सोन्याचे भाव जास्त उतरत नाहीत तर वाढत जातात. थोडक्यात सांगायचं तर तुम्हाला नुकसान होत नाही आणि स्थावर मालमत्ते च्या रूपाने तुम्ही सोन्याकडे पाहू शकता.

तसेच सोनं हे श्रीमंती च प्रतीक मानले जाते. अगदी प्राचीन काळापासून भारतात फक्त राजे महाराजे नाही तर इजिप्तशियन संस्कृती मधे सुद्धा सोन्याला फार महत्व होते. इजिप्तशिअन फेरो सोन्याच्या शवपेटीत स्वतःला दफन करवून घायचे. आपल्या भारतातली प्राचीन काळातील मंदिरे त्यांच्या भिंती आणि कळस ह्या सोन्याच्या असायच्या. थोडक्यात सांगायचं तर सोन्याला प्राचीन काळापासून खूप महत्व होते जे इतर कोणत्याही धातू ला नव्हते. भारतावर परकीयांची बरीच आक्रमणे झाली त्या मध्ये खूप मोठ्या प्रमाणात सोनं लुटून घेऊन गेले.

शेवटचं कारण म्हणजे दिसायला हा धातू खूपच सुंदर दिसतो. सोन्याला कोणताही आकार द्या, मनाला भुरळ पडल्याशिवाय राहत नाही. त्यामुळेच इतका महाग असूनही सोनं खरेदीला आजसुद्धा पसंती दिली जाते. दिवाळी मध्ये सोने खरेदीचा योग खूप कमी लोकं मिस करतात कारण ह्या वेळी सोनं थोडं स्वस्त ही झालं असतं कारण दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस मध्ये कपात केलेली असते. मग करणार का तुम्ही सुद्धा ह्या दिवाळीत सोने खरेदी?