VIDEO : एम.आय.एम. च्या नगरसेवकाचा असंस्कृतपणा

115
  • स्टंटबाजी करणं पडलं महागात : नगरसेवकाकडून मिळाला चोप
  • माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावास विरोध करणाऱ्या एमआयएम नगरसेवकाला बदडले.
औरंगाबाद : औरंगाबाद महानगर पालिकामध्ये आयोजित सर्वसाधारण सभेत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करत असताना त्याचवेळी श्रद्धांजली कार्यक्रमास विरोध करणाऱ्या एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यास भाजप नगरसेवकांनी बदडले. श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध करताच नगरसेवक राज वानखेडे, दिलीप थोरात, प्रमोद राठोड, माधुरी अदवंत, रामेश्वर भादवे, उपमहापौर विजय औताडे यांनी मतीन यांच्यावर धावून जात जोरदार मारहाण केली. व सभागृहाबाहेर पिटाळून लावले. त्यानंतर सय्यद मतीनं यास कायमस्वरूपी निलंबन करावे अशी मागणी केली.
व्हिडीओ लिंक :  https://youtu.be/XquAMMMgczo