वैष्णवी फॅशन कंपनीतर्फे शाही दिमाखात फॅशन शो कार्यक्रम संपन्न

635

पुणे प्रहार । समाजात सामान्य लोकांमध्येसुध्दा खूप कलाकार दडलेले असतात. नवोदित कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने वैष्णवी फॅशन कंपनीतर्फे खराडी येथे ‘पुणे ग्रँड फॅशन शो’चे आयोजन करण्यात आले होते.

मंगळवार (ता. 12) सायंकाळी 5 ते 9 या वेळेत खराडीतील मॅपल हॉटेलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात कोणतेही शुल्क आकारले गेले नाही तसेच सामान्य लोकांमध्ये फॅशनची आवड निर्माण व्हावी हा एकच उद्देश डोळ्यासमोर ठेवून ह्या फॅशन शोचे आयोजन करण्यात आले असल्याचे कार्यक्रमाचे संयोजक अनिता गोरक्ष कुंजीर यांनी पुणे प्रहारच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

कार्यक्रमाचे उद्घाटन मिसेस इम्प्रेस 2018 च्या विजेत्या रूपाली सावंत, अभिनेता सचिन दानाई यांच्या हस्ते झाले. डान्स कोरिओग्राफर म्हणून दीपक बिडकर यांनी काम पाहिले तर ज्युरी म्हणून पोलिस उपनिरीक्षक प्रेमा पाटील, डॉ. सारिका सावंत, अ‍ॅड. उर्मिला जाधव, अंजली पोरजे आदींनी काम पाहिले.

श्री. सचिन शितोळे, कल्पेश मेहता, हनुमंत सातव, क्षमा धुमाळ, पूनम जाधव, परेश वैद्य, तेजस्विनी पाटील यांनी स्पोर्टिंग पार्टनर म्हणून काम पाहिले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मेकअप पार्टनर म्हणुन रुपाली वांबोरे अणि दीपा गीरी यांनी काम पाहिले. नम्रता काळे यांनी ड्रेस डिझाईन तर मिस्टर कॅटेेगिरीसाठी खत्री कलेक्शन यांनी काम पाहिले. ग्रोमर म्हणुन सारा मोतीवाला आणि योगिता गोसावी यांनी ट्रेनिंग दिले. या कार्यक्रमाचे ग्रोमिंग दिनांक 10 व 11 नोव्हेंबर रोजी फोनिक्स मॉल, विमान नगर येथे पार पडले.

कार्यक्रमात वैष्णवी फॅशन कंपनी प्रस्तुत शेतकरी पॅटर्न या आगळ्या वेगळ्या शेतकर्‍याची कथा घेऊन मराठी चित्रपटाचा पोस्टर अनावरण हा भव्य दिव्य सोहळा प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थित पार पडला. याावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अमित चौगुले, योगेश पवार, विशाल घोलप, पल्लवी वाघासकर, जूगनू गांधी, जागृती जावळे, सनी अगरवाल हे उपस्थित होते.

या शो मध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांची ढोलताशाच्या गजरात भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली. तसेच सहभागी स्पर्धकांना कंपनी ट्रॉफी, कंपनी सर्टिफिकेट अणि मुकुट देऊन गौरविण्यात आले.

या फॅशन शो मधून अंतिम फेरीत निवड झालेल्या स्पर्धकांची महाअंतिम फेरी गोवा येथे पार पडणार आहे असे कार्यक्रमाच्या आयोजकांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूनम पांडे अणि किरण शितोळे यांनी केले तर अभिजीत बारवकर (वन बाय टु क्रिएशन) व मिस्टर गुप्ता यांनी फोटोग्राफी व व्हिडिओग्राफी केली.