‘स्वराज्यरक्षक संभाजी’ फेम अभिनेत्री ‘महाराणी येसूबाई’ ने या अभिनेत्या बरोबर साजरी केली भाऊबीज

393

भाऊबीज हा हिंदूधर्मीय भाऊ बहीण साजरा करीत असलेला एक सण आहे.मोठ्या उत्साहात दिवाळी हा सण देशभर साजरा होत आहे.

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या सध्या गाजत असलेल्या लोकप्रिय मालिकेमधील आपल्या अभिनय कौशल्याने सर्वांची मने जिंकनारे ‘महाराणी येसूबाई’ हे पात्र साकारणारी प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड़ हीने मराठी चित्रपट अभिनेता सुभाष यादवचे औक्षण करून भाऊबीज साजरी केली.सुभाषने अनेक चित्रपटांमधे काम केले असून लवकरच त्याची प्रमुख नायक भूमिका असलेला चित्रपट प्रदर्शित होत आहे व ‘कॉमेडी तड़का’ या शोमुळे तो लोकप्रिय आहे.पहील्यापासूनच प्राजक्ता आणि सुभाष न चुकता भाऊबीज व रक्षाबंधन साजरा करतात तसेच अनावश्यक खर्च टाळून अनाथआश्रला किंवा वृद्धाश्रमाला मदत करतात.

अभिनेता सुभाष यादव याने फेसबूक वर भाऊबीज संदर्भात काही फ़ोटोसहीत एक पोस्ट शेयर केली असून त्यात दोघेही खूप आनंदात दिसत आहेत.या भावनिक फेसबूक पोस्ट मधे सुभाषने लिहले आहे की ‘काय बोलू या बहिनी बद्दल..? माझ्या पाठीशी नेहमी खंबीर उभी राहनारी व वयाने लहान असूनही विचारांनी खुपच प्रगल्भ व ठाम असणारी अशी ही बहीण..प्रचंड वाचन व अतिशय उत्तम अभिनय क्षमता असलेली व अभिनयाबरोबरच शिक्षणाचे शिवधनुष्य पेलनारी अशी ही बहीण..प्राजक्ताताई, मला तुझा अभिमान वाटतो..अशी बहीन मला प्रत्येक जन्मी मिळो”

(फोटो : अभिनेता सुभाष यादव यांच्या फेसबुकवरून)