नगरसेवक जावेद शेख यांच्यापासून जीवितास धोका

194

पिंपरी – नगरसेवक जावेद शेख हे गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचे असून त्यांनी आपल्याला जिवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यांच्याकडून जीवितास धोका आहे, असे निवेदन शिवसेना नगरसेवक प्रमोद कुटे यांनी पोलीस आयुक्‍तांना दिले आहे. तसेच शेख यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही केली आहे.

आकुर्डी प्रभागातील साई मंदिर परिसरातील रहिवाश्‍यांनी उपद्रवी गुंड प्रवृत्तीच्या मुलांना रविवारी चोप दिला.
तसेच या गुंडांच्या त्रासाबाबत निगडी पोलीस ठाण्यात त्याची तक्रार दिली. लोकप्रतिनिधी म्हणून आपणही नागरिकांसोबत पोलीस ठाण्यात गेलो होतो. ही गुंड प्रवृत्तीची मुले जावेद शेख यांचे कार्यकर्ते आहे. यामुळे संतापलेल्या शेख यांनी मला धमकी दिली आहे.

धमकीचा प्रकार दोनवेळा घडला असून शेख यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून आपल्या जीवितास धोका आहे. या गंभीर विषयात तातडीने लक्ष घालून शेख यांच्यावर कारवाई करावी.