सॅमसंग (मोबाइल फोन) ठरला भारतातील मोस्ट कन्झ्युमर-फोकस्ड ब्रँड

250

साउथ कोरियातील सॅमसंग मोबाइल फोन्स या टेक कंपनीने टीआरएच्या मोस्ट कन्झ्युमर-फोकस्ड ब्रँड्स रिपोर्ट 2019 (सीएफबी 2019) या तिसऱ्या आवृत्तीमध्ये स्थान मिळवून लक्षणीय यश साध्य केले आहे. लॅपटॉप निर्माता डेल, अॅपल आयफोन व एलजी (टेलिव्हिजन्स) यांनी अनुक्रमे दुसरे, तिसरे व चौथे स्थान मिळवले आहे. आघाडीचà A50 या 100 मोस्ट कन्झ्युमर-फोकस्ड ब्रँड्सपैकी 56 भारतीय आहेत आणि एलआयसी, टाटा मोटर ्स व अमुल (मिल्क) यांनी भारतीय यादीत आघाडी घेतली आहे.

अहवाल जाहीर करण्यात आल्यानिमित्त लताना, टीआरए रिसर्चचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. चंद्रमौली यांनी सांगितले, “ग्राह बोलत असतात आणि सॅमसंग ऐकत असतो. ग्राहक-केंद्री नावीन्यावर भर देणाऱ्या सॅमसंगने मोबाइल फोन श्रेणीमध्ये तंत्रज्ञानामध्ये बाजी माली आहे आणि उत्कृष्ट मापदंड निर्माण केले आहेत व त्यामुळे ग्राहकांशी गहिरे, सक्षम नाते निर्माण केले आहे.”