केरळात आस्मानी संकट : एका दिवसात २५ जणांचा मृत्यू, आतापर्यंत ७७ जणांचा बळी

190
मदतकार्यासाठी नौदलाचे २१ बचाव पथक पाठवण्यात आले असून, पूरग्रस्तांना बोटींच्या सहाय्याने सुरक्षितस्थळी दाखल करण्यात येत आहे. मदतकार्यासाठी पथकात वाढ करण्यात आली आहे. बुधवारी जवळपास ८१ जणांना सुरक्षितस्थळी दाखल करण्यात आले.
– बचावासाठी नौदलचे पाच पथक पाच बोटींसह वायानाद जिल्ह्यात दाखल झाले आहे.
– दोन पथके थलापुझा जिल्ह्यात पाठविण्यात आले आहे.
– तर पोरुन्नान्नूर आणि अंचुकुनूकडे प्रत्येक एक पथक रवाना झाले आहे.
– एर्णाकुलम जिल्ह्यात एका बोटीसह तास पथके पूरग्रस्तांना मदत करीत आहेत.
– एक पथक पझाला बेटावर लक्ष ठेवून आहे. हे पथक येथील पूरग्रस्त नागरिकांची प्रत्येक्ष भेट घेऊन त्यांना दिलासाही देत आहे.

विमानसेवेला पावसाचा फटका –
पावसाचा फटका येथील विमानसेवेलाही बसला. कोचीन विमानतळाजवळ असलेल्या पेरियार नदीवरील धरण ओव्हरफ्लो झाले आहे. यामुळे धरणाचे पाणी विमानतळाच्या धावपट्टीवर आल्याने कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ शनिवारी दुपारपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.