मध्य प्रदेशात हवाई दलाचे मिग-21 ट्रेनर विमान कोसळले

213

भोपाळ : मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये हवाई दलाचे मिग-21 ट्रेनर विमान आज कोसळले आहे. दरम्यान, ग्रुप कॅप्टन आणि स्क्वॉड्रन लीडर दोघांनाही सुरक्षित बाहेर काढण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. नेमकी घटना कशामुळे घडली याविषयी माहिती अजून समोर आली नाही.