मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंच्या कार्यक्रमाला गणेश नाईकांची पुन्हा दांडी!

193
मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे दोन नेते शहरात असताना गणेश नाईक उपस्थित नसल्याने चर्चेला तोंड फुटलंय.

मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंच्या कार्यक्रमाला गणेश नाईकांची पुन्हा दांडी!

विनय म्हात्रे, नवी मुंबई 25 सप्टेंबर : युतीची चर्चा अंतिम टप्प्यात असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नवी मुंबईत आज दोन कार्यक्रमांना उपस्थित होतो. हे दोनही नेते अशा कार्यक्रमात एकत्र येणं याला वेगळं महत्त्व आहे. या दोनही नेत्यांना एकत्र येण्याला निमित्त होतं माथाडी कामगारांचे नेते अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचे. तर दुसरा कार्यक्रम होता नवी मुंबईतल्या मराठा भवनाला भेट देण्याचा. हे दोन दिग्गज नेते एकत्र शहरात असताना नुकतेच राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये आलेले ज्येष्ठ नेते गणेश नाईक हे मात्र या दोनही कार्यक्रमांना उपस्थित नव्हते. नाईकांच्या या अनुपस्थितीची जोरदार चर्चा आता सुरू झालीय. या आधी भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नढ्ढा हे नवी मुंबईत आले असताना गणेश नाईक हे कार्यक्रम अर्ध्यावर सोडून काही मिनिटांमध्ये बाहेर पडले होते.

उदयनराजेंना कोंडीत पकडण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची नवी खेळी!

या कार्यक्रमाला माजी खासदार संजीव नाईक मात्र उपस्थित होते. गणेश नाईक हे नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे. मात्र त्यांच्या नाराजीचं नेमकं कारण काय आहे याविषयी संभ्रम आहे. नाईकांची निर्मिती असलेलं बावखळेश्वर मंदिर पाडण्यात आलं होतं. सुभाष देसाई यांनी त्या वेळी मंदिर वाचवण्यास मदत केली नाही असं नाईकांना वाटते त्यामुळे ते शिवसेनेवर नाराज असल्याचीही चर्चा आहे.

‘मी स्वत:हून EDच्या कार्यालयात जाणार, माहिती हवी असेल तर देऊन येतो’

भाजप आणि शिवसेनेच्या जागावाटपाची चर्चा आता अंतिम टप्प्यात आलीय. शेवटच्या 11 जगांचा प्रश्नं काही प्रमाणात सुटून तो आता फक्तं 5 जागांच्या तडजोडीवर आलाय. आता 5 विधानसभा मतदारसंघातील तीढा आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात होणाऱ्या अंतीम चर्चेतून सोडवला जाणार आहे. युतीच्या जागावाटपात दोन्ही पक्षांनी युती तूटेल अशी कोणतीही परिस्थिती उद्भवणार नाही याची काळजी घेतल्यामुळे युती अभेद्य रहाणार असल्याचं दिसतंय. दोनही पक्षांमध्ये जोरदार इन्कमिंग झाल्यामुळे परिस्थिती बदललीय या बदलत्या परिस्थित काही अडचणी असल्याने हा विलंब होत असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. तुटेपर्यंत ताणणार नाही असं दोन्ही पक्षांनी ठरविल्यामुळे युती तुटणार नाही हे निश्चत समजलं जातंय.