केंद्रीय आरोग्‍य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्‍या हस्‍ते सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्‍या लस उत्‍पादन केंद्राचे उद्घाटन

209

कंपनीची आतापर्यंत केंद्रामध्‍ये ३००० कोटी रूपयांची गुंतवणूक 

नवीन केंद्र वर्षाला पन्‍नास दशलक्ष डोसेस उत्‍पादन करणार आणि पुढील ५ वर्षांमध्‍ये ३००० रोजगारांची निर्मिती करणार 

राष्‍ट्रीय,९ सप्‍टेंबर २०१९: सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) या जागतिक पातळीवर उत्‍पादित व विक्री करण्‍यात येणा-या डोसेसच्‍या आधारावर जगातील सर्वात मोठ्या लस उत्‍पादक कंपनीने आज पुण्‍यामध्‍येकेंद्रीय आरोग्‍य मंत्री डॉ. हर्ष वर्धन,तसेच एसआयआयचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी व आयव्‍हीएमएचे अध्‍यक्ष श्री. अदार पूनावाला यांच्‍या उपस्थितीत लसींसाठी नवीन बहुकार्यक्षम उत्‍पादन केंद्राचे उद्घाटन केले. आतापर्यंत ३००० कोटी रूपयांच्‍यागुंतवणूकीसह हा प्‍लाण्‍ट वाढीव उत्‍पादनासाठी अत्‍याधुनिक उपकरण व सुविधांसह कार्यसंचालन पाहतो. 

२ दशलक्ष चौरस फूटावर विस्‍तृत पसरलेले हे व्‍यापक नवीन केंद्र युरोपियन व अमेरिकन खंडांतील १५० देशांच्‍या गरजांची पूर्तता करेल. ज्‍यामुळे एसआयआयचा बाजारपेठ हिस्‍सा आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर १० ते १५ टक्‍क्‍यांपर्यंत वाढेल. वर्षाला पन्‍नास दशलक्ष डोसेसच्‍या उत्‍पादन क्षमता असलेले हे नवीन केंद्र पुढील ५ वर्षांमध्‍ये ३००० रोजगारांची निर्मिती करेल. 

हे उत्‍पादन केंद्र नोव्‍हेंबर २०१९ मध्‍ये त्‍याच्‍या उत्‍पादन कार्यसंचालनाला सुरूवात करेल. या केंद्राची अतिरिक्‍त क्षमता,तसेच उत्‍पादनामध्‍ये सुधारित स्थिरता देण्‍याचा प्रयत्‍न आहे. अमेरिकन व युरोपियन खंडांवर फोकस करणा-या या व्‍यापक केंद्रामध्‍ये प्रांताच्‍या संबंधित लस उत्‍पादन नियमांचे पालन करणा-या अत्‍याधुनिक उपकरणाचा व्‍यापक श्रेणी आहे. 

हे नवीन केंद्र थर्मोस्‍टेबल रोटासिलासह एचपीव्‍ही व टीडीएपी अशा लसींचे निर्माण करेल. तसेच हे केंद्र ट्रास्टुझुमब (हर्सेप्टिन) आणि यूस्टेकिनुब (स्टेलारा®) यांसारखे मोनोक्‍लोनल अॅण्‍टीबॉडीजचे देखील निर्माण करेल. प्रत्‍येक लस प्राप्‍तकर्ताचे संरक्षण करण्‍यासह आरोग्‍यदायी जीवन देईल. 

नवीन केंद्राच्‍या उद्घाटनाबाबत बोलताना एसआयआयचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अदार पूनावाला म्‍हणाले, ”जगभरातील मुलांसाठी उत्‍तम हेल्‍थकेअर व लसीकरण हे अत्‍यंत थोर कार्य आहे,जे माझ्या हृदयाच्‍या जवळ आहे. वर्धित उत्‍पादन क्षमतांनी युक्‍त हे नवीन केंद्र त्‍याच दिशेने उचललेले एक पाऊल आहे. भारतीय व आंतरराष्‍ट्रीय बाजारपेठांमध्‍ये एसआयआय सुलभपणे व परवडणा-या दरात उपलब्‍ध होऊ शकणा-या आवश्‍यक लस देण्‍याचा प्रयत्‍न करते. एक संस्‍था म्‍हणून आमचा संसाधनांचा प्रभावीपणे वापर करत जागतिक लोकांना सर्वोत्‍तम प्रतिबंधात्‍मक हेल्‍थकेअर सोल्‍यूशन्‍स देण्‍याचा मनसुबा आहे.” 

आरोग्‍य व कुटुंब कल्‍याण,विज्ञान व तंत्रज्ञान आणि भूविज्ञानासाठी माननीय मंत्री डॉ. हर्ष वर्धन म्‍हणाले, ”भारतीय लोकांचे जीवन आरोग्‍यदायी असण्‍याची खात्री घेणे हे आमचे अहोभाग्‍य आहे. या दृष्टिकोनाकरिता आम्‍ही विविध मोहिमांवर काम केले आहे. मंजरी येथील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्‍या नवीन केंद्रासारखे उपक्रम आम्‍हाला खात्री घेण्‍यामध्‍ये मदत करतील की,आम्‍ही भारतीय लोकांच्‍या गरजांची पूर्तता करण्‍यासाठी सुलभपणे सुविधा उपलब्‍ध करून दिल्‍या आहेत.” 

नुकतेच सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (एसआयआय) एनआयएचच्‍या (यूएसए) सहयोगाने थर्मोस्‍टेबल रोटाव्‍हायरस लस तयार केली आहे. क्रांतिकारी विकास म्‍हणून मानली जाणारी ही लस टिकून राहते आणि या लसीमध्‍ये अनियमित तापमानामध्‍ये दीर्घकाळापर्यंत टिकून राहण्‍याची उच्‍चस्‍तरीय क्षमता आहे. रोटासिल नावाची लस २५सेल्सिअस तापमानामध्‍ये ३० महिन्‍यांपर्यंत टिकून राहते. 

भारताची पहिल्‍या क्रमांकाची जैवतंत्रज्ञान कंपनी म्‍हणून ओळखली जाणारी एसआयआय भारतभरात लसीकरण मोहिम स्‍वस्‍थ लसीकरण भारतराबवण्‍यामध्‍ये सहाय्यक राहिली आहे. ही मोहिम लसीकरणाच्‍या महत्‍त्‍वाबाबत जागरूकता निर्माण करते आणि देशाला आरोग्‍यदायी व लसीकरण भविष्‍याच्‍या दिशेने घेऊन जाण्‍याचा प्रयत्‍न करते. हा उपक्रम लोकांमध्‍ये जागरूकता निर्माण करतो आणि मुले व गरोदर मातांचे घातक आजारांपासून संरक्षण करण्‍यासाठी आवश्‍यक लसीकरण करून घेण्‍यास प्रोत्‍साहित करतो. 

पूर्ण लसीकरणाच्‍या महत्‍त्‍वाला चालना देत आयव्‍हीएमएचे अध्‍यक्ष श्री. पूनावाला यांनी मार्गदर्शन करण्‍यासोबत अनावश्‍यक प्रक्रिया,पायाभूत सुविधांचा अभाव आणि भारताला पूर्णपणे लसीकरण देश बनवण्‍यामध्‍ये अडथळा आणणा-या इतर प्रमुख आव्‍हानांचे निराकरण करण्‍याचा सातत्‍याने प्रयत्‍न केला आहे. कंपनी देशामध्‍ये महत्‍त्‍वपूर्ण परिवर्तन घडवून आणण्‍यासाठी कार्यक्षमपणे काम करते आणि संबंधित भागधारक व सरकारी संस्‍थांच्‍या सहयोगाने काम करत कार्यक्षम इकोप्रणाली सुलभ करण्‍याचा प्रयत्‍न करते. पायाभूत सुविधांमध्‍ये सुधारणा करण्‍याव्‍यतिरिक्‍त कंपनी लसींसाठी पुरेशा प्रमाणातील स्‍टोरेज सुविधांचा अभाव,परिवहनाचे योग्‍य मोड्स आणि इतर समस्‍यांवर देखील काम करणार