ग्रामीण भागातील पाणी आणण्याचे कष्ट वाचविण्यासाठी ‘नीर चक्र ‘ चे वितरण !

318

आधुनिक तंत्राद्वारे ‘ट्री इनोव्हेटिव्ह फाउंडेशन ‘ चा  २५ कुटुंबाना मदतीचा हात 

पुणे : ग्रामीण भागातील पाणी आणण्याचे कष्ट वाचविण्यासाठी ट्री इनोव्हेशन फाउंडेशन तर्फे ‘नीर चक्र’ ही पाणी वाहून नेणारी आधुनिक ढकलगाडी पुरंदर तालुक्यातील २५ गरीब कुटुंबाना देण्यात आली. या आधुनिक तंत्राद्वारे ‘ट्री इनोव्हेटिव्ह फाउंडेशन ‘मदतीचा हात दिला मिळाला. फाउंडेशनचे प्रमुख तन्वीर अस्लम इनामदार यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

एका वेळी ८० लिटर पाणी वाहून देणाऱ्या या तीनचाकी ‘नीरचक्र’ ला  वॉटर फिल्टर ,गायरोस्कोपिक स्टॅबिलायझर, ब्रेक, नळाची तोटी आहे.

महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार यांनी या प्रकल्पासाठी १ लाख रुपयांची मदत केली आहे. तन्वीर पी. इनामदार यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. हा कार्यक्रम रविवारी झाला.