स्विस बँकेतील पैशाची माहिती मिळणार

342

नवी दिल्ली : भारत आणि स्वित्झर्लंडदरम्यान माहितीची विनाअडथळा देवाणघेवाण पद्धती आज रविवारपासून लागू होणार असल्यामुळे भारतीयांच्या स्विस बँकेतील पैशासंबंधीची माहिती उपलब्ध होणार आहे, अशी माहिती सेंट्रल बोर्ड ऑफ डिरेक्ट टॅक्सेस (सीबीडीटी)ने दिली आहे. ‘काळा पैसा ‘विरोधात केंद्र सरकारच्या लढ्यातील ही महत्त्वपूर्ण घटना मानली जात आहे. ‘सीबीडीटी’ने प्राप्तिकर विभागासाठी या संदर्भात एक धोरण आखले असून, या संदर्भात स्विस अधिकाऱ्यांशीही चर्चा केली आहे.