“प्रतिनिधी बदला, परिस्थिती बदलेल’

220

भोर – भोर विधानसभा मतदारसंघात प्रतिनिधी “बदला , परिस्थिती बदलेल’ यासाठी शिवसेनेने रविवार (दि. 25) पासून मतदारसंघात जनजागृती पदयात्रेला सुरुवात केली आहे. छत्रपती शिवाजीमहाराजांनी स्वराज्याची शपथ घेतलेल्या रायरेश्‍वर गडावरील शिवमंदिरात करून या पदयात्रेची सुरुवात करून आगामी विधानसभेचे एकप्रकारे रणशिंग फुंकले आहे.

शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख कुलदिप कोंडे, शिवापुरचे शिवसेना नेते रमेश कोंडे, भोर तालुका युवा सेनेचे प्रमुख केदार देशपांडे, युवराज जेधे, अमोल पांगारे यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला.

यावेळी शिवसेना तालुका प्रमुख ज्ञानेश्‍वर शिंदे, दीपक बर्डे, गणेश धुमाळ, दादा मोहोळ, महिला प्रमुख निषा सपकाळ, जिल्हा परिषद सदस्या शलाका कोंडे, भोर तालुका पंचायत समिती सदस्या पूनम पांगारे, नारायण कोंडे, सोपान कंक, हनुमंत कंक यांच्यासह विविध गावांचे सरपंच, कार्यकर्ते या जनजागृती पदयात्रेत सहभागी झाले आहेत. भोर शहरातील शेटेवाडी चौपाटी येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करुन वीसगांव खोऱ्यातील आंबाडे येथून भोर शहरात या जनजागृती पदयात्रेतून “प्रतिनिधी बदला, परिस्थिती बदलेल’चा नारा देत जनजागृती करण्यात आली. यावेळी पथनाट्य आणि परिवर्तन गिते सादर करुन नागरिकांना आकर्षित केले जात आहे.