नराधम शिक्षकाने केले तब्बल आठ महिने दोन अल्पवयीन विद्यार्थीनींचे लैंगिक शोषण; शिक्षकी पेशाला काळीमा

215

बोरघर/माणगाव (विश्वास गायकवाड) : शिक्षक आणि विद्यार्थी या पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना माणगांव तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या फलानी शाळेत  घडली या बाबत सविस्तर वृत्त असे की…

ज्या विश्वासाने पालक आपल्या मुलांना शाळेत शिक्षकांच्या ताब्यात सोपवतात तेच शिक्षक विद्यार्थ्याचे लैगिक शोषण करून शिक्षणासारखे पवित्र क्षेत्र बदनाम करीत आहेत. मुख्याध्यापकच शालेय विद्यार्थ्यानींचे लैगिक शोषण करीत असतील तर पालकानी आपल्या लहान लहान निष्पाप मुलांना शाळेत कोणाच्या भरोस्यावर पाठवावी? आणि पीड़ित विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी दाद कुठे मागायची हा गंभीर प्रश्न या लांछनास्पद प्रकारामुळे निर्माण झाला आहे.

सविस्तर असे की माणगांव तालुक्यातीत फलाणी येथील जिल्हा परिषदेतील शिक्षक नित्यानंद धोंडू पाटील वय 50, रा. कावेरी अपार्टमेंट गोरेगाव  या शिक्षकाने दहा ते आकारा वर्षाच्या दोन मुलींचे गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून लैंगिक शोषण करीत होता.

या शैक्षणिक वर्षात या शाळेत नव्याने रूजू झालेल्या शिक्षिके जवळ या प्रकाराबाबत या दोन विद्यार्थनींनी वाच्यता केल्यावर हा प्रकार उघडकीस आला.

पालकांना व ग्रामस्थांना हा प्रकार कळल्यावर ग्रामस्थांनी नित्यानंद पाटील आणि शिक्षिका पत्नीला फलाणी ला बोलावून घेतले. दम देताच नित्यानंद पाटील याने आपल्या  विकृतीची कबुली देवून आपण हे कृत्य केल्याचा जबाब दिला. ग्रामस्थांनी या शिक्षकाला थोप देवून गोरेगाव पोलिसांच्या ताब्यात दिले.

गोरेगाव पोलिसांनी नित्यानंद पाटील विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केला असुन भा.द.वी कलम ३७६  (एच एफ) पोस्को ३ , ४ ६ . ५०६ तसेच अनुसूचित जाती प्रतिबंधक कायदा १९८९ चे कलम  ३ (१) (११) अन्वये करण्यात आले असुन आरोपीस अटक करण्यात आली आहे.