कॉसमॉस बॅंकेच्या सर्व्हरवर आंतरराष्ट्रीय सायबर हल्ला

173
  • हॅकरने घातला 94 कोटी 42 लाखाला गंडा 
  • तब्बल 28 देशांतील एटीएममधून काढले 80 कोटी 50 लाख
  • हॉंगकॉंमधील बॅंकेत 13 कोटी 92 लाख वर्ग

पुणे : कॉसमॉस बॅंकेच्या सर्व्हर स्स्टिीमवर आंतरराष्ट्रीय सायबर हल्ला(मायवेअर अटॅक) झाला आहे. आंतरराष्ट्रीय हॅकरने 80 कोटी 50 लाख रुपये अवघ्या दोन तास 13 मिनीटांत क्‍लोन व्हिसा व एटीएम कार्डचा वापर करुन काढले आहेत. हे पैसे 28 देशांतील एटीएमधून काढले गेल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये क्‍लोन व्हिसा कार्डव्दारे काढण्यात आलेली रक्कम 78 कोटी इतकी आहे. तर भारतातील विविध एटीएममधून क्‍लोन एटीएम कार्ड वापरुन 2 कोटी 50 लाख इतकी रक्कम काढण्यात आली आहे. तसेच सोमवारी स्विफ्ट ट्रांन्झॅक्‍शनव्दारे कॉसमॉस बॅंकेतील 13 कोटी 92 लाख रुपये हॉंगकॉंग येथील हॅनसंग बॅंकेत वर्ग झाले आहेत. याप्रकारे बॅंकेला 94 कोटी 42 लाखाचा गंडा घालण्यात आला आहे. या घटनेने हादरलेल्या कॉंसमॉस बॅंकेने तातडीने त्यांचे एटीएम, इंटरनेट बॅकींग आणी मोबाईल बॅंकींग सेवा अनिश्‍चित काळासाठी बंद ठेवली आहे.
याप्रकरणी कॉसमॉस बॅंकेतर्फे मॅनेजींग डायरेक्‍टर सुहास सुभाष गोखले(53) यांनी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तसेच पुणे सायबर क्राईम सेल, रिझर्व बॅंक ऑफ इंडिया आणी आंतरराष्ट्रीय पातळीवर व्हिसा व्यवस्थापनाला याची माहिती देण्यात आली आहे. या सायबर हल्लयाचा तपास करण्यासाठी दोन आंतरराष्ट्रीय सायबर सुरक्षा एजन्सीलाही काम सोपवण्यात आले आहे.

व्हीसा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी (11 ऑगस्ट) कॉसमॉस बॅंकेच्या व्हिसा कार्डवरील व्यवहार नेहमीच्या तुलनेत जास्त व संशयास्पद असल्याचे माहिती ऍडमिनिस्ट्रेटर सुरेशकुमार यांनी दिली होती. त्यांनी तात्काळ कॉसमॉस ई-सोल्यूशनच्या व्यवस्थापकीय संचालक आरती ढोले यांना याची खबर दिली. यानंरत ढोले यांनी तातडीने व्हीसा व एटीएमची सेवा बंद केली. दरम्यान त्यांना रुपे डेबीट कार्ड(बॅंकेचे एटीएम कार्ड) धारकाने खात्यातील शिल्लक रकमेबाबत टोल फ्री क्रमांकावर तक्रार केली होती. यानंरत त्यांनी रुपे डेबीट कार्डची सेवा देखील बंद केली. काळे यांनी या सर्व संशयास्पद व्यवहरांची कल्पना बॅंकेचे चेअरमन मिलींद काळे यांनी दिली. यानंतर बॅंकेने व्हीसा व रुपे कार्डच्या गैरव्यवहाराची पडताळणी केली असता, व्हीसाच्या 12 हजार व्यवहारांची नोंद आढळली. याव्दारे 28 देशांतील एटीएममधून तब्बल 78 कोटीची रक्कम काढल्याचे आढळले. तर रुपे डेबीट कार्डचे 2 हजार 800 व्यवहार झाल्याची नोंद झाली. याव्दारे 2 कोटी 50 लाखाची रक्‍कम काढली गेली होती.दरम्यान सोमवारी(13 ऑगस्ट)स्विफ्ट ट्रांन्जॅक्‍शनव्दारे कॉसमॉस बॅंकेतील 13 कोटी 92 लाख रुपये हॉंगकॉंग येथील हॅनसंग बॅंकेत ए.एल.एम.ट्रेडींग नावाच्या खात्यात जमा झाल्याचे उघडकीस आले. याप्रकारे बॅंकेला हॅकरने 94 कोटी 42 लाखाला गंडा घातला आहे. हॉंगकॉंगमध्ये पैसे वळवले गेल्यावर लगेच कॉसमॉस बॅंकेने चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

ग्राहकांनी घाबरु नये ; व्यवहार सुरळीत : मिलींद काळे (चेअरमन) 
वरील संशयास्पद व्यवहारांची रक्कम बॅंकेच्या कोणत्याही खातेदाराच्या खात्यातून काढली गेलेली नाही. यामुळे ग्राहकांनी घाबरण्याची गरज नाही. बॅंकेचे दैनंदिन व्यवहार नेहमी प्रमाणे सुरळीत सुरु आहेत. बॅंग ग्राहक इतर बॅकांच्या एटीएम सेंटरमधून पैसे काढू शकतात. तसेच ग्राहकांच्या सोयीसाठी प्रत्येक शाखेत आरटीजीएसची सुविधा वाढविण्यात आली आहे.

.. असा झाला सायबर अटॅक 
बॅंक -मुख्य सर्व्हर(स्विच) – व्हीसा अशी साधारणतहा यंत्रणा असते. एखाद्या खातेदाराने व्हीसा कार्डचा वापर एटीएममध्ये केल्यास काही सेकंदात याची माहिती मुख्य सर्व्हरला दिली जाते. मुख्य सर्व्हर संबंधीत खातेदाराचा एटीएम क्रमांक आणी खात्यातील शिल्लक रकमेची पडताळणी करतो. यानंतर लागलीच ही माहिती बॅंकेला पाठवली जाते. बॅंक मुख्य सर्व्हरला सूचना देऊन संबंधीत एटीएमचे व्यवहार पूर्ण करण्यास सांगते. ही प्रक्रिया अवघ्या काही सेकंदाची असते. या घटनेत मुख्य सर्व्हरच डमी होता. यामुळे डमी सर्व्हरने दिलेल्या सूचनेनूसार बॅंकेने डमी व्हीसा कार्डधारकांना पैसे वर्ग केले आहेत.