VIDEO : काय तुम्ही झील कॉलेजची टम्बलर कार पाहिलीत?

211

पुणे (प्रहार प्रतिनिधी) : झील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये मेकॅनिकल इंजिनीअरिंग विभागातील विद्यार्थी आणि प्राध्यापक यांनी नुकतीच बॅटमोबिल टम्बलर कारची निर्मिती केली आहे. बॅटमोबिल हि सुपरहीरो बॅटमॅन चित्रपटातील संकल्पना असून तरुणवर्गात या बॅटमोबिल कारविषयी विशेष आकर्षण आहे. हि बॅटमोबिल मेकॅनिकल इंजिनीअरिंग मधील क्लिष्ट यंत्रणा (मेकॅनिझम) वापरून बनवण्यात आली असून अशा प्रकारे हॅन्डमेड प्रकारात बनवलेली हि भारतातील पहिलीच बॅटमोबिल कार आहे. या कारमध्ये एक्सटर्नल स्टीयरिंग मेकॅनिझम, इन्व्हर्टेड हब सिस्टिम चा पहिल्यांदाच उपयोग करण्यात आला आहे.

या कार मध्ये वेगवेगळ्या २६ कारचे कंपोनंट वापरण्यात आले असून सिंक्रोनाइझेशन हा वेगवेगळे कंपोनंट वापरण्यातला सगळ्यात मोठा अडथळा होता. या बॅटमोबिलचा वेग तशी १२० किलोमीटर इतका असून लो ग्राउंड क्लिअरन्स मुळे अँटिरोल इफेक्ट मिळतो. सुरक्षेच्या दृष्टीने या कारमध्ये वापरण्यात आलेली सस्पेंशन अव्वल दर्जाची असून व्हेईकल व्हिजन सिस्टिम सारखी पेटंटेड टेकनॉलॉजि वापरण्यात अली आहे. डॅशबोर्ड वर नाईट व्हिजन कॅमेराद्वारे घेतलेले चित्रण व्हेईकल व्हिजन सिस्टिम मध्ये रात्रीच्या वेळेला ड्रायव्हरची प्रखर प्रकाशामुळे मुळे होणाऱ्या त्रासापासून आणि अपघातांपासून सुटका करते. उल्लेखनीय बाब म्हणजे फक्त ५५ दिवसांच्या कालावधीत आणि केवळ ३.५ लाख रुपये किमतीत या बॅटमोबिल कारची निर्मिती करण्यात आली आहे.

या संपूर्ण बॅटमोबिलची निर्मिती संस्थेचे सचिव प्रा. जयेश काटकर , संस्थेचे कार्यकारी संचालक श्री. प्रदीप खांदवे आणि झील कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. अजित काटे यांच्या मार्गदर्शनाखाली मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभाग प्रमुख डॉ.अमोल उबाळे , प्रा.प्रवीण परीट, प्रा. सुहास सावंत, प्रा. महेंद्र कल्याणशेट्टी , प्रा. सुशील कांबळे, श्री.प्रवीण लेंडवे, श्री. राजेंद्र भोसले, श्री. शरद घाडगे, श्री. नितीन थिटे, श्री हरिदास लेंडवे यांनी केली. बॅटमोबिलच्या निर्मितीमध्ये मेकॅनिकल इंजिनीअरिंगच्या सिद्धेश शिंदे, शुभम कुदळे, विवेक गुरव, वेदांत जगताप या विद्यार्थांनी विशेष सहभाग नोंदवला.