‘बारामतीत अजित पवारांचं काम जास्त, 2019 ला त्यांना हरवणं फक्त आशावाद’

164

मुंबई : ‘बारामतीत अजित पवारांचं काम जास्त, 2019 ला त्यांना हरवणं आशावाद ठरू शकतो. आमचं टार्गेट 2019 ची विधानसभा निवडणूक नसून 2024 लोकसभा निवडणूक आहे,’ असा निर्धार भाजप नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. आधी बारामतीकडे आमचं दुर्लक्ष झालं. त्यामुळे आता आगामी काळात मी स्वत: प्रत्येक आठवड्यात बारामतीला जाणार आहे. त्यामुळे लोकांमध्ये आमच्याप्रती विश्वास निर्माण होईल, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.