डॉ. एस. एन. पठाण यांच्या अभीष्टचिंतन कार्यक्रमात घडले जीवन : शिक्षण विषयक  चिंतन ! 

178

पुणे : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि राज्याचे माजी शिक्षण संचालक डॉ. एस. एन. पठाण यांच्या वयाच्या सत्तरी पूर्ती निमित्त पुण्यात अभीष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दिग्गज शिक्षण तज्ज्ञांच्या जीवन शिक्षण विषयक चिंतनामुळे हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला.

४ जुलै  रोजी अल्पबचतभवन  सभागृह(पुणे कॅम्प) येथे सायंकाळी  ६ वाजता झालेल्या सत्कार सोहळयाला  राज्यभरातून राज्यभरातील शिक्षणक्षेत्रातील दिग्गजांची मांदियाळी उपस्थित होते.  याच कार्य्रक्रमात कृष्णा मेडिकल अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ वेदप्रकाश मिश्रा यांचे  आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून  भारतीय शिक्षणपद्धती या विषयावर व्याख्यान झाले. तसेच समृद्ध मातृभूमी या मासिकाच्या अंकाचे प्रकाशन उपस्थितांच्या हस्ते झाले.

महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार हे कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते. तर प्रमुख पाहुणे  म्हणून डॉ. शां. ब. मुजूमदार, डॉ. विश्वनाथ कराड, डॉ. सर्जेराव निमसे, एन. सी. जोशी, पं. वसंत गाडगीळ, डा. संजय अडसूळ, मौलाना मुफ्ती शाकीर खान, लतीफ मगदूम हे शिक्षणक्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात यश्वस्वी प्रेरणादायक व्यक्तिमत्वांचा सत्कारही या कार्य्रक्रमात करण्यात आले. त्यात जिल्हाधिकारी अय्याझ तांबोळी, सहायक पोलिस आयुक्त समीर शेख, डॉ. तौसिफ मलिक, गीतांजली शेळके, डॉ. संजीव खुर्द, मारूती भांडकोळी, आकांक्षा चव्हाण, यांचा त्यात समावेश होता. ग्लोबल हेल्थकेअर अँड एज्युकेशन फाउंडेशन, महा फेडरेशन ऑफ मायनॉरिटीज एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स यांनी या कार्य्रक्रमाचे आयोजन केले.

४ जुलै हा डॉ एस एन पठाण यांचा वाढदिवस असल्याचे औचित्य साधून हा सोहळा झाला.डॉ. पठाण यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. डॉ. सर्फराज पठाण यांनी प्रास्ताविक केले. अतुल कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

शिक्षण हेच या देशाच्या प्रगतीचे माध्यम आहे. सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन आणण्याची क्षमता शिक्षण हेच आहे. हे शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचविण्याचे काम डॉ.एस.एन. पठाण यांनी केले. ते समाजाला  प्रेरणा देणारे दीपस्तंभ आहेत. समता, समवेदना आणि समानुभूती  या महान व्यक्तींनी दाखवलेल्या रस्त्यावर चालले पाहिजे.’