आषाढी एकादशी निमित्त ‘तुका म्हणे’ आणि ‘वैकुंठ नायका’ रंगनृत्य आविष्कार

233

७ जुलै रोजी आयोजन 

पुणे : आषाढी एकादशी निमित्त संत तुकारामांच्या अभंगावर आधारित ‘तुका म्हणे’ हा  रंगनृत्य आविष्कार ‘कलावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट’ तर्फे  ७ जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे. रविवार दि ७ जुलै सकाळी ९ ४५ वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह (कोथरूड, पुणे) येथे हा कार्यक्रम होणार आहे. संकल्पना दिग्दर्शन अरुंधती पटवर्धन, कल्याणी काणे यांची आहे. याचबरोबर  संत ज्ञानेश्वर, चोखामेळा, नरहरी सोनार, नामदेव,तुकाराम या संतांच्या  अभंग रचनांचा नृत्याविष्कार  ‘संत सेवा संघ’ आणि नीलिमा नृत्यालय  तर्फे ‘वैकुंठ नायका’ या नावाने याच कार्यक्रमात सादर केला जाणार आहे. ‘वैकुंठ नायका’ला संगीत जीवन धर्माधिकारी यांचे आहे.