#PavitraPunia : सीन शूट करताना हुक तुटले अन्…, प्रसिद्ध अभिनेत्रीबरोबर सेटवर घडला धक्कादायक प्रसंग; फोटो व्हायरल

टीव्ही अभिनेत्री आणि ‘बिग बॉस’मध्ये झळकलेली पवित्रा पुनिया अलीकडेच एजाज खानबरोबर ब्रेकअप झाल्यामुळे चर्चेत होती. दोघेही गेल्या ३ वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. अशातच आता तिने शूटिंगदरम्यानचा एक धक्कादायक अनुभव सांगितल्याने ती चर्चेत आहे. काही काळापूर्वी ‘इश्क की दास्तान-नागमनी’च्या शूटिंगदरम्यान जंगलात एक सीन शूट करताना ती खाली पडली होती आणि तिच्या ब्लाऊजचे हुक तुटले होते. याबाबत तिने खुलासा केला आहे.

New Year 2024 : नववर्षाच्या स्वागतासाठी पुणे शहर परिसरात ४ हजार पोलिसांचा बंदोबस्त; हे’ रस्ते वाहनांसाठी बंद; अनेक ठिकाणच्या वाहतुकीत बदल, अनेक नियम आणि पोलिसांची करडी नजर, जाणून घ्या सर्व काही एकाच क्लिकमध्ये

३७ वर्षीय पवित्रा पुनियाने अलीकडेच ‘ई-टाइम्स’शी बोलताना ‘इश्क की दास्तान-नागमनी’च्या शूटिंगदरम्यान झालेल्या अपघाताबाबत सांगितलं. तिला जंगलात पळतानाचा एक सीन शूट करायचा होता. पण सीन करताना असं काही घडलं की ती घाबरली होती. पवित्राने सांगितलं की सीन करताना तिच्या ब्लाऊजचे हुक तुटले. या अपघातानंतर आपण काही मिनिटं घाबरल्याचं ती म्हणाली. तसेच ब्लाउज स्ट्रॅप उघडल्यावर ती खाली बसली. पण हे सगळं घडायला नको होतं, असं पवित्रा म्हणाली.

Samsung Galaxy S24 : आयफोनला टक्कर देणाऱ्या Samsung Galaxy S24 सीरीजची किंमत समोर

पवित्रा पुनिया पुढे म्हणाली की मला त्यावेळी असा प्रश्न पडत होता की माझ्याबरोबर जे घडलं ते लोकांना दिसलं तर नसेल ना? “मी काही काळ सुन्न झाले होते. सीनदरम्यान असं काहीतरी घडेल, असं वाटलं नव्हतं. तो प्रसंग खूप वाईट होता. मी वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाउज आणि साडी नेसल्यामुळे हे घडलं,” असं पवित्रा म्हणाली. तिने कबूल केलं की तिचे ब्लाउज रिव्हिलींग असतात. तसेच आपल्याला नेहमी परफेक्ट सीन करायला आवडतात. मी खलनायिकेची भूमिका केली आहे तर ती पडद्यावर हॉट आणि सेक्सी दिसली पाहिजे, असंही तिने नमूद केलं.

(हेही वाचा – शाळेच्या सहलीत मुख्याध्यापिकेचा विद्यार्थ्यासोबत रोमान्स, Photo Viral; प्रिन्सिपलवर काय कारवाई होणार याकडे लक्ष)

पवित्रा पुनियाने सांगितलं की त्या दिवशी तिने घातलेल्या ब्लाउजला फक्त एक हुक होता. त्यावेळी तिचे वजनही थोडे वाढलेले होते. तिने अडीच किलो वजन वाढवले ​​होते. त्यामुळे काहीतरी गोंधळ होणार अशी तिला शंका होती. पण हुक तुटल्यावरही कोणाला काहीच दिसलं नाही, याचं समाधान असल्याचं ती म्हणाली. यानंतर तिला तिथे उपस्थित असलेल्या संपूर्ण युनिटने मदत केली. हुक तुटल्यानंतर सर्वजण कॅमेरा बंद करा, असं ओरडू लागले आणि त्यांनी शूट थांबवून मदत केली, असं पवित्राने सांगितलं.