केतकी चितळे ट्रोल प्रकरणी एकाला अटक

297

मुंबई – अभिनेत्री केतकी चितळेबद्दल अश्लील कमेंट करणाऱ्या एकाला गोरेगाव पोलिसांनी औरंगाबाद येथून अटक केली आहे. सतीश पाटील असे या आरोपीचे नाव आहे.

केतकीने हिंदी भाषेत एक व्हिडिओ अपलोड कला होता. त्या व्हिडिओसंदर्भात नेटकऱ्यांनी अर्वाच्च भाषेत तिला ट्रोल केले होते. यावर केतकीने पुन्हा ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देणारा व्हिडिओ पोस्ट केला होता.

मात्र, तरीही तिला अश्लील भाषेत ट्रोल केले गेले. त्यामुळे तिने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. तसेच, व्हिडिओ ट्रोल करणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली होती.

यावर मुख्यमंत्र्यांनी पोलीस विभागाला यासंदर्भात चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मुंबई पोलिसांच्या गोरेगाव पोलिसांनी यासंदर्भात तपास करीत औरंगाबाद येथून सतीश पाटील या क्रेन ऑपरेटरला अटक केली आहे. यासंदर्भात आणखी काही जणांना अटक करण्यात येणार असल्याचे पोलिसांचे म्हटले आहे.