‘बॉर्डर’ सिनेमाला २२ वर्षे पूर्ण, जाणून घ्या या सिनेमा बद्दल काही भन्नाट गोष्टी

208

देशभक्तीपर चित्रपट म्हटल्यावर आजही अनेकांच्या डोळ्यासमोर येणारे पहिले नाव म्हणजे जे. पी. दत्ता दिग्दर्शित ‘बॉर्डर’. हा मल्टीस्टारर चित्रपट प्रदर्शित होऊन १३ जून रोजी २२ वर्ष पूर्ण झाली.

भारत-पाकिस्तान युद्धाची कथा असणाऱ्या या चित्रपटाचे अनेक किस्से लोकप्रिय आहेत. आज या चित्रपटाला २२ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त जाणून घेऊयात काही भन्नाट गोष्टी.

१९९७ साली बॉर्डर हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला, या चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

चित्रपटाचे दिग्दर्शक जे. पी. दत्ता यांनी चित्रपटा बनवण्याआधी तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांची परवाणगी मागितली होती.

बॉर्डर चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दत्ता यांना जीवे मारण्याच्या अनेक धकम्या आल्या होत्या. त्यामुळेच त्यांच्या सुरक्षेसाठी दोन सशस्त्र अंगरक्षकांची नेमणूक करण्यात आली होती.

या चित्रपटामध्ये सनी देओलने लष्करातील अधिकारी कुलदीप सिंग चांदपूरी यांची भूमिका साकारलेली, त्यांना ‘महा वीर चक्र’ पुरस्कार प्रदान करण्यात आलेला

या चित्रपटाचे सर्व चित्रिकरण बिकानेरमध्ये १९७१ साली वाळवंटात झालेल्या युद्धातील युद्धभूमीवरच करण्यात आले होते.

या चित्रपटाच्या चित्रिकरणामध्ये खऱ्या सैनिकांनी सहभाग घेतला होता. तसेच रणगाडे, लष्कारी वहाने आणि काही शस्त्रास्त्रेही खरी होती.