Facebook युजर्सना घरबसल्या पैसे कमवण्याची संधी

283

फेसबुक युजर्ससाठी आता एक खूशखबर आहे कारण फेसबुकने युजर्सना घरबसल्या पैसे कमवण्याची संधी दिली आहे. मात्र यासाठी युजर्सना एक अ‍ॅप डाऊनलोड करावं लागणार आहे.

Study by Facebook नावाचं हे अ‍ॅप फोनमध्ये इन्स्टॉल केल्यानंतर युजर्सद्वारे वापरण्यात येणाऱ्या फीचर, विविध अ‍ॅपवर खर्च केलेला वेळ, देश, डिव्हाईस आणि नेटवर्कच्या प्रकाराची माहिती संकलित केली जाणार आहे.

मार्केट रिसर्चमधून युजर्सच्या आवडीनिवडीची माहिती फेसबुकला मिळणार आहे. फोन ट्रॅक करण्याची परवानगी देणाऱ्या युजर्सना फेसबुक पैसे देणार आहे.

अ‍ॅप डाऊनलोड करणाऱ्या युजर्सला किती पैसे मिळणार याची कोणतीही अधिकृत माहिती फेसबुककडून देण्यात आलेली नाही.