धक्कादायक! चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार

174

भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे. अलिगड आणि उज्जैनमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना समोर आल्यानंतर आता जबलपूरमध्ये देखील धक्कादायक घटना घडली आहे. जबलपूरमध्ये चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे. रविवारी घडलेल्या या घटनेनंतर नराधमाला अटक देखील करण्यात आलं आहे. आरोपी अल्पवयीन असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीला रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून यावेळी आणखी कोण होतं का? याचा शोध घेतला जात आहे.