अंधेरीत मद्यधुंद हवाई सुंदरीवर बलात्कार; आरोपी अटकेत

163

मुंबई – हवाई सुंदरीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अंधेरी एमआयडीसी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. स्वप्नील अरुणकुमार बडोनिया (वय 23) असे आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता १० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार (ता. ४) रोजी दुपारी २ ते २.३० दरम्यान अंधेरी एमआयडीसी येथील कमलेश अपार्टमेंटमध्ये आरोपी स्वप्नील बडोनिया व त्याच्या साथीदारांनी फिर्यादी तरुणी (वय २५) दारूच्या नशेत असताना तिच्यावर जबरदस्ती करत तिला जखमी केले. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पोलीसांनी स्वप्नील बडोनिया याच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.