राज ठाकरेंचा ‘मनसे’ संवाद

145

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्याला प्रारंभ झाला असून तीन दिवसांच्या या दौऱ्यात राज ठाकरे हे शाखाध्यक्षांशी संवाद साधणार आहेत मात्र या संवादादरम्यान ‘मोबाईल बंदी’चा फतवा काढला आहे. तसेच प्रत्येकावर करडी नजर ठेवण्यात येणार आहे. प्रसारमाध्यमांना कुठली बातमी मिळू नये याचीही खबरदारी घेण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपच्या कारभाराविरोधात ए लाव रे तो व्हिडीओ द्वारे राज्यभर रान पेटवणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांचा फायदा आघाडीला झालाच नाही उलट भाजप आणि सेनेचे उमेदवार प्रचंड मतांनी निवडून आले. या सर्व राजकीय घडामोडी घडत असताना. आता लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहे.