सलमानचा ‘भारत’ वादात

136

मुंबई – बॉलिवूड भाईजान सलमान खान लवकरच ‘भारत’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याच्या अपोझिट कॅटरिना कैफ झळकणार आहे. हा चित्रपट आता प्रदर्शनासाठी सज्ज झालेला असतानाच चित्रपटाविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे.

चित्रपटाच्या ‘भारत’ या शीर्षकामुळे भावना दुखावत असल्याचा दावा करत याचिककर्त्याने दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. बोधचिन्हे व नावे (अनुचित वापर प्रतिबंधक) कायद्यानुसार ‘भारत’ शब्दाचा वापर व्यावसायिक कारणांसाठी करता येत नसून हे या कायद्याचे उल्लंघन असल्याचे याचिकेत म्हटले आहे.

याशिवाय चित्रपटातील एक डायलॉग वगळण्याची मागणीही या याचिकेत करण्यात आली आहे. या डायलॉगमध्ये सलमान आपल्या भारत नावाची तुलना देशासोबत करताना दिसतो. दरम्यान ‘भारत’ चित्रपट येत्या ५ जूनला म्हणजेच ईदच्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.