पब्जी खेळताना हार्ट अटॅकने मुलाचा मृत्यू

223

पब्जी गेमच्या जाळ्यामध्ये सध्याची तरुण पिढी पूर्णाता अडकली आहे. या गेमच्या नादापायी अनेक तरुणांनी आपला जीव गमावला आहे. या गेममुळे अनेकांनी आत्महत्या केल्या असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मध्यप्रदेशमध्ये पब्जीमुळे अशी घटना घडली आहे जे ऐकूण सर्वांनाच धक्का बसला आहे. एका १६ वर्षाच्या मुलाला पब्जी गेम खेळत असताना हार्ट अटॅक आला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. फुरकान कुरैशी असं या मुलाचे नाव असून तो मध्यप्रदेशच्या नीमच येथे कुटुंबियांसह राहत होता. तो १२ वीमध्ये शिकत होता. तब्बल ६ तास तो पब्जी गेम खेळत होता. मृत्यूच्या आधी तो जोर जोरात ओरडत होता की स्फोट कर स्फोट कर. त्यानंतर तो चक्कर येऊन खाली कोसळला.

कार्डियक अरेस्टमुळे फुरकानचा मृत्यू

फुरकान कुरैशीच्या कुटुंबियांनी त्याला ताबडतोब रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र काही वेळानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. ही घटना नीचमच्या पटेल प्लाझामध्ये झाली. फुरकानवर उपचार करणाऱ्या डॉक्टर अशोक जैन यांनी सांगितले की, कार्डियक अरेस्टमुळे फुरकानचा मृत्यू झाला. पब्जी खेळत असताना अचानक त्याला हार्ट अटॅक आला. तो खूप वेळ पब्जी गेम तणावाखाली खेळत होता. गेम खेळत असताना त्याच्या हृदयाचे ठोके देखील वाढले होते आणि त्यातच त्याला हार्ट अटॅक आला.

लग्नसोहळ्यासाठी आले होते 

फुकरानचे वडील हरुन राशिद यांनी सांगितले की, ‘आम्ही काही दिवसापूर्वीच नातेवाईकाच्या घरी लग्नानिमित्त निमच येथे आलो होतो. लग्नाच्या तयारीमध्ये आम्ही व्यग्र होतो. फुकरान सतत गेम खेळत होती. मी त्याल अनेकदा ओरडा सुध्दा दिला. मात्र त्याने ऐकले नाही. तो सतत पब्जी गेम खेळत होता. ज्यावेळी तो गेम खेळत होता त्यावेळी त्याच्या रुममध्ये त्याची छोटी बहिण फिजा देखील होती.’

मृत्यूआधी फुकरान जोरात ओरडला

फुकरानच्या बहिणीने सांगितले की, ‘फुकरान अचानक जोर-जोरात ओरडू लागला. स्फोट कर, स्फोट कर. अयान तू मला हरवले आणि मला मारले. आता मी तुझ्यासोबत खेळणार नाही असे फुकरान ओरडत होता.’ त्यानंतर त्याच्या डोक्यात दुखू लागले आणि तो चक्कर येऊन खाली कोसळला. त्यानंतर फिजाने आई-वडिलांना बोलावून आणले. त्याला घेऊन सगळे जण हॉस्पिटलला गेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.