…अन् नागराजने शरद जाधवच्या आईची ‘ही’ इच्छा केली पूर्ण

195

मुंबई – ‘उत्तर शोधलं की जगणं बदलतं’, अशी दमदार टॅगलाईन असलेला ‘कोण होणार मराठी करोडपती’ शो नुकताच छोट्या पडद्यावर सुरू झाला आहे. शरद जाधव नावाच्या एका स्पर्धकाच्या आईचे स्वप्न या कार्यक्रमामुळे पूर्ण होणार आहे. खुद्द नागराज मंजुळे यांनी त्याच्या आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

स्वप्नांची पूर्तता करणारा खेळ, अशी ओळख असणाऱ्या या कार्यक्रमात खरंच स्वप्न पूर्ण करण्याचा किस्सा घडला आहे. शरद जाधव या स्पर्धकाने त्यांच्या आईची म्हणजेच सुवर्णा जाधव यांची एकदा तरी विमान प्रवास करण्याची इच्छा या मंचावर व्यक्त केली होती. ही इच्छा नागराज पूर्ण करतील, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले होते.

Nagraj Manjule fulfilled sharad jadhao mother wish

शरद जाधव त्याच्या आईसोबत

Nagraj Manjule fulfilled sharad jadhao mother wish

शरद जाधव त्याच्या आईसोबत

यावरून हेदेखील सिध्द होते की ‘कोण होणार मराठी करोडपती’ हा केवळ एक खेळ नाही. तर, यामध्ये अनेक भावना, इच्छा, स्वप्न दडलेली आहेत. या खेळात सहभागी होणारे स्पर्धक त्यांच्या इच्छा, स्वप्नं पूर्ण करण्याच्या तयारीने येतात. समोरील प्रश्नाचे अचूक उत्तर देऊन खेळाची एक एक पायरी जिकूंन चांगली रक्कम मिळवून आपण आपली स्वप्न सत्यात उतरवतात.

नागराज मंजुळे यांचा हा पहिला वहिला सुत्रसंचालनीय कार्यक्रम आहे. त्यामुळे नागराज हा कार्यक्रम कसा साकारतात, याची चाहत्यांना उत्सुकता होती. सर्वसामान्य व्यक्तीच्या आईसाठी नागराज यांनी घेतलेल्या पुढाकारानंतर चाहत्यांमध्ये त्यांची आणखी क्रेझ वाढली आहे.