पावसाळी अधिवेशनाला 17 जूनपासून सुरूवात

159

मुंबई – राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 17 जूनपासून सुरू होणार आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत याविषयी निर्णय झाला. हे अधिवेशन मुंबईतच होणार असून तीन आठवडे चालणार आहे.

यात प्रत्यक्ष कामकाज हे 12 दिवस चालणार आहे, तर राज्याचा अर्थसंकल्प 18 जूनला मांडला जाणार आहे. मागील अधिवेशनात राहिलेल्या राज्यपालांच्या अभिभाषणावर 19 ते 20 जून या दोन दिवसात चर्चा केली जाणार आहे.

प्रत्यक्षात अर्थसंकल्पावर 21 जून व 24 जूनला चर्चा केली जाणार असल्याचे कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे 17 जूनपासून सुरू होणारे पावसाळी अधिवेशन तीन आठवडे चालणार आहे.