भारतीय भाग्यवान आहेत, कारण त्यांच्याकडे मोदी आहेत- डोनाल्ड ट्रम्प

143

नवी दिल्ली : भारतीय भाग्यवान आहेत कारण त्यांच्याकडे नरेंद्र मोदी आहेत, असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. मोदींच्या अभूतपूर्व यशानंतर जगभरातील नेते त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडियावर ट्विट केलं आहे. नकतंच नरेंद्र मोदींशी फोनवर बोलणं झालं. त्यांच्या मोठ्या विजयाबद्दल त्याचं अभिनंदन केलं आहे, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत.

मोदी महान आहेत आणि सर्व भारतीय देखील भाग्यवान आहेत, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या शुभेच्छानंतर नरेंद्र मोदींनी त्यांना रिप्लाय देत, त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.