जयंत पाटलांचं नियंत्रण सुटलं; लोकसत्ताच्या पत्रकाराच्या कानाखाली वाजवली

145

पुणे | शेकापचे आमदार जयंत पाटील यांचं स्वतःवरचं नियंत्रण सुटल्याचं पहायला मिळालं. त्यांनी लोकसत्ताचे प्रतिनिधी हर्षद कशाळकर यांच्या कानशिलात लगावली.

रायगड लोकसभा मतदारसंघाच्या प्रेसरुमध्ये हा प्रकार घडला. निवडणूक केंद्रात पत्रकाराला मारहाण झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

लोकसत्तामध्ये हर्षद कशाळकर यांनी गेल्या काही दिवसांमध्ये ज्या बातम्या लिहिल्या होत्या, त्यातील काही बातम्यांचा राग मनात ठेऊन त्यांनी हा प्रकार केल्याचं कळतंय.

दरम्यान, या प्रकरणी आता निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात येणार आहे. सर्व उपस्थित पत्रकारांनी याचा निषेध केला आहे.