“चंद्रकांतदादा, कधी येताय बारामतीत गुलाल खेळायला?” : रुपाली चाकणकर

198

पुणे | बारामतीत गुलाल खेळायला येणार म्हणणाऱ्या मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांनी जोरदार टोला लगावला आहे. त्यांनी यासंदर्भात फेसबुक पोस्ट लिहिली आहे.

चंद्रकांत दादा पाटील, गुलाल खेळायला येणार होता बारामतीत. येताय ना?? गुलाल पण तयार आहे आणि ज्याच्यासाठी खेळायचा तो उमेदवार तर 1,54,000 मतांनी विजयी झाला आहे, असं चाकणकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी बारामती जिंकण्याची भाषा केली होती. 23 तारखेला बारामतीत गुलाल उधळायला येणार, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

दरम्यान, बारामतीची जागा भाजपला जिंकता आली नाही. याठिकाणी सुप्रिया सुळे यांनी कांचन कुल यांचा दणदणीत पराभव केला.