राजीव गांधींना अभिवादन

143

पुणे : राजीव गांधी स्मारक समिती, मिशन राजीव आणि पुणे शहर  काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय भारतरत्न राजीव गांधी यांना अभिवादन करण्यात आले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी यांच्या हस्ते कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील राजीव गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी राजीव गांधी स्मारक समितीचे प्रमुख गोपाळ तिवारी, माजी नगरसेवक वीरेंद्र किराड, सचिन तावरे, लहुअण्णा निवंगुणे, भूषण राहाम्बरे, भोला वांजळे, नितीन पायगुडे, विवेक भरगुडे, अस्लम बागवान, सुरेश उकिरडे, महेश अंबिके, संजय अभंग, आबा जगताप आदी कार्यकर्त्यांसह उद्यान निरीक्षक राजकुमार जाधव उपस्थित होते.