आठवी ते दहावीच्या विद्यार्थी-पालकांसाठी सुपरमाईंड संस्थेतर्फे मोफत शैक्षणिक समुपदेशन

154

पुणे : “इयत्ता आठवी व दहावी महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमात, मुल्यामापनात बदल होत असतात. तसेच दहावी सीबीएसईच्या परीक्षेच्या पॅटर्नमध्ये बदल झाला आहे. हा बदल नेमका काय आणि कसा आहे. याबद्दल आठवी, नववी व दहावीच्या विद्यार्थी व पालकांसाठी पुण्यातील सुपरमाईंड संस्थेतर्फे मोफत समुपदेशन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे,” अशी माहिती सुपरमाईंड संस्थेच्या संचालिका मंजुषा वैद्य आणि अर्चिता मडके यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मंजुषा वैद्य म्हणाल्या बदलणारा अभ्यासक्रम, बदललेला पाटर्न आणि मूल्यमापन पद्धतीप्रमाणे अभ्यासाच्या पद्धतीत बदल केला पाहिजे. तो का्य व कसा? याबद्दल सप्ताहात मार्गदर्शन केले जाणार आहे.

दोषपूर्ण अभ्यास पद्धतीत का्य बदल करावा? आकलनासह वाचन कसे करावे? लेखनाचा वेग वाढविण्यासाठी का्य करावे? भाषा विषयातील कृतिपत्रिका कशी सोडवावी? गुण अणि गुणवत्ता मिळवण्यासाठी सुरवातीपासूनच स्वअध्ययनाची सवय कशी करावी? अशा अनेक गोष्टींवर मार्गदर्शन केले जाणार आहे. या सप्ताहात पालकांसमवेत विद्यार्थ्याशी वैयक्तिक बोलून त्यांच्या अभ्यासात येणाऱ्या अडचणीवर तोडगा काढला जाणार आहे.”

“या सप्ताहाला शुक्रवार, दि. १० मे २०१९ पासून सुरवात होत आहे. रोज सकाळी १० ते ८ यावेळेत विद्यार्थी व पालक समुपदेशनासाठी येऊ शकतात. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाकडून दहावी व आठवीचे पाठ्यपुस्तके, पॅटर्न व मुल्यामापनात बदल होत आहेत. कृतियुक्त (Activity Based), उपयोजित (Application Based), कौशल्याधारित व क्षमताधिष्ठित ज्ञान रचनावादावर आधारित या अभ्यासक्रमाबद्दल पालक व विद्यार्थ्यांच्या मनात खूप संभ्रम आहेत. तसेच CBSE बोर्डाने दिलेला नविन पॅटर्न काय आहे, त्याप्रमाणे अभ्यास पद्धतीत करावयाचे बदल, अभ्यासाचे नियोजन, विषयवार वेळापत्रक याबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात अनेक शंका आहेत. यासंदर्भात अनेक अनेक व्याख्याने होत आहेत. पण प्रत्येक विद्यार्थ्याला वैयक्तिक पातळीवर भेटून सर्व शंकांचे निरसन होणे गरजेचे असल्यामुळे सुपरमाइंड संस्थेने या या उपक्रमाचे आयोजन केले आहे.” असे अर्चिता मडके यांनी सांगितले.

“या समुपदेशन सप्ताहात आठवी ते दहावीचे विद्यार्थी आपल्या पालकांसमवेत समुपदेशन घेऊ शकतील. १० मेपासून सुपरमाइंडचे नवी पेठ, पुणे येथील ऑफिसमध्ये याचे आयोजन केले गेले आहे. समुपदेशन मोफत असले, तरी नियोजनासाठी पालकांनी वेळ निश्चित करून येणे आवश्यक आहे. त्यासाठी ९०४९९९२८०७/८/९ या क्रमांकावर किंवा www.supermindstudy.com या संकेतस्थळावर संपर्क करावा. सुपरमाईंड संस्थेने आयोजिलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थी व शिक्षण प्रक्रियेत दुवा साधला जाईल व विद्यार्थ्यांना अभ्यासाची शास्त्रशुद्ध दिशा मिळेल, असा विश्वास वाटतो,” असे मंजुषा वैद्य यांनी नमूद केले.