सेठ ताराचंद हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभाग अचानक बंद

258

अतिदक्षता विभाग 33 महिन्यांच्या भाडेतत्वार हेल्थकेअर मेडिकल फाँडेशन संस्थेला दिला होता चालवायला

प्रहार जनशक्ती पक्षाची करडी नजर

पुणे (प्रहार प्रतिनिधी) : सेठ ताराचंद चॅरीटेबल ट्रस्ट हॉस्पिटल यांच्या विश्वस्तांनी घेतलेल्या एका विचित्र निर्णयामुळं माणुसकिला धक्का देणारी एक गोष्ट समोर आली आहे.

सेठ ताराचंद हॉस्पिटल ट्रस्टने हेल्थकेअर मेडिकल फाँडेशन संस्थेला आपल्या हॉस्पिटलमधील जागा 33 महिन्यांच्या भाडेतत्वार अतिदक्षता विभाग चालविण्याकरीता दिली होती, भाडेकरारासंबंधी वाद असताना हेल्थकेअर मेडिकल फाँडेशनने अचानक अतिदक्षता विभाग बंद करण्याची तुगलकी फर्मान ट्रस्ट विश्वस्तांनी घेतले.

हॉस्पिटलमध्ये रूग्ण उपचार घेत असताना आणि रूग्णांना अथवा रूग्णांच्या नातेवाईकांना न कळवता हा निर्णय अचानकपणे घेण्यात आल्याचे रूग्णांनी ‘पुणे प्रहार’च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

या दरम्यान ताराचंद ट्रस्टच्या विश्वस्तांनी वकिलाद्वारे नोटीस पाठवून अतिदक्षता विभागाला उपचार घेत असलेल्या 9 रूग्णांना हलवण्यास सांगत वीज आणि पाणी पुरवठा बंद करण्याची धमकी दिली.

हे सर्व प्रकरण चालू असताना, विश्वस्तांना आणखी एक तुगलकी फर्मान काढले आणि तडका फडकी ट्रस्टच्या रिकाम्या खोल्या असणार्‍या वसतिगृहात अतिथी देय किंवा भाडे तत्वार राहणार्‍या अतिदक्षता विभागातील महिला कर्मचार्‍यांना 48 तासात काम सोडून जाण्यास सांगितले आहे.

प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांना हा सर्व प्रकार कळताच त्यांनी हेल्थकेअर मेडिकल फाँडेशनला आपला पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे.

प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने श्री. गौरव जाधव, श्री. नयन पुजारी, श्री. नौशाद शेख, श्री. उमेश महाडिक, श्री. नितीन पगार, श्री. मारूती अप्पा धावडे यांनी या पूर्ण विषयाचा कायदेशीररित्या पाठ पुरवा करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सर्व प्रकारात रूग्णांनी किंवा रूग्णांच्या नातेवाईकांची कुठल्याही प्रकारे गैरसोय झाल्यास रूग्णवाहिका व प्राणवायू सिलेंडर पुरवठा थांबविल्यास, ते खपवून घेतले जाणार नाही असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षातर्फे देण्यात आलेला आहे.

अतिदक्षता सुविधा अल्प दरात पुरवणारी संस्था असे नाव लौकिक करणार्‍या हेल्थकेअर मेडिकल फाँडेशनने यांच्या फर्मानाविरूद्ध चॅरिटी कमिशन ऑफ पुणे येथे दाद मागितली आहे. पुढील प्रकाराची कारवाई प्रलंबित आहे.