“मी विधानसभा लढणार हे नक्की पण माझा मतदारसंघ राष्ट्रवादीचे नेेते ठरवतील”

183

पुणे | माझ्या गेल्या काही वर्षाच्या कामातून माझी सामान्य माणसाशी नाळ जोडली गेली आहे. त्यामुळे मी विधानसभा लढणार हे नक्की पण माझा मतदारसंघ राष्ट्रवादीचे नेेते ठरवतील, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे युवा नेते आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी केलं आहे.

कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातून रोहित पवार विधानसभा लढणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यावरही रोहित यांनी मौन सोडत जागेचा चेंडू वरिष्ठांच्या कोर्टात टोलवला. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

मी पवार साहेबांच्या विचाराने काम करतो. गेल्या अनेक दिवसांपासून मी संपूर्ण महाराष्ट्र फिरत आहे. लोकांचे प्रश्न मी जाणून घेतले आहेत. ते प्रश्न मी नक्की सोडवेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

पक्षाचे नेते जो काही निर्णय घेतील तो मला मान्य असेल, असं सांगायलाही रोहित पवार विसरले नाहीत.