कशिश प्रोडक्शन आयोजित फॅशन शो उत्साहात

184

महाराष्ट्र पत्रकार संघ सह विविध मिडिया सहभागी

पुणे : कृष्णा देशमुख प्रतिनिधी : पुणे येथील अण्णा भाऊ साठे सभागृहात कशिश प्रॉडक्शन तर्फे लहान मुले, मुली, पुरुष व महिला यांचा फॅशन शो विविध मान्यवरांच्या उपस्थित उत्साहात संपन्न झाला.

शो चे नाव मिस्टर, मिस अँड मिसेस वेस्ट इंडिया व रायसिंग स्टार किड्स फॅशन शो पर्व 3 असे होते.

ह्या स्पर्धे साठी मेकअप ला ISAS, Pcmc हे होते.

आयोजक व कोरिओग्राफर योगेश पवार, सह कोरिओग्राफर महिमा नागमोती, इव्हेंट हेड निखिल बहारवाल, प्रमुख पाहुणे म्हणून बांधकाम व्यावसायिक मुद्रा ग्रुपचे चेअरमन उमेश पवार, महाराष्ट्र पत्रकार संघाचे पुणे शहर अध्यक्ष कृष्णा देशमुख, अभिनेत्री ऋतुजा लिमये, अभिनेते प्रसाद सुर्वे, विशाल घोलप, साहिल कुमार, सोनल कौर यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर, प्रेक्षक व स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या स्पर्धेला जुरी म्हणून रोशनी कपूर, भावना शर्मा, मुग्धा देशपांडे, तनिष्का वासवानी व प्रसाद खैरे असे दिग्गज मान्यवर उपस्थित होते.

आयोजक योगेश पवार यांनी नवीन मॉडेल्स तसेच ग्रामीण भागातील मॉडेल्सला संधी देऊन उत्कृष्ट कामगिरी बजावली. या स्पर्धेचे विजेते शमिका देशमुख, देव डेरे , रजत मिरके, नम्रता जंगले, शिवानी सैनी हे असून उपविजेते मानव अहुजा, वीरेन चव्हाण, निहारिका सिंग, विराज बेलदरे, यश कामठे, देव येरापले, भाग्यश्री बोरसे, रेश्मा दाश, आशा नेगी, गरीष्मा गजवानी, चैताली पाटील असे होते.