बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्सने व्हॅलेंटाइन डे च्या दिवशी अनोख्या पद्धतीने सादर केली नवीन ब्रँड ओळख ‘Caringly Yours’

158

पुणे, 14 फेब्रुवारी 2019: पुण्यात मुख्यालय असलेली देशातील आघाडीची खासगी जनरल इन्शुरन्स कंपनी असलेल्या बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्सने ‘Caringly Yours’ या त्यांच्या नव्या ब्रँड ओळखीचे अनावरण कोरगाव पार्कमधील अतिशय ट्राफिकच्या ठिकाणी 1500 हेल्मेटचा वापर करून बनविलेली टॅग लाइन असलेल्या फलकाद्वारे केला. टॅगलाइन सादर करण्यासाठी असा अनोखा प्रकार अवलंबिण्यामागील कारण म्हणजे व्हॅलेंटाइन डे च्या दिवशी शहरातील लोकांना ‘जर तुम्ही प्रेम करतात तर हेल्मेट घालून तुमची काळजी दाखवा’ हा संदेश देणे आहे, ज्यामुळे केवळ चालकाची सुरक्षाच निश्चित होत नाही तर त्याच्या प्रियजनांना मानसिक शांतताही मिळते.

बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्सचे अध्यक्ष श्री संजीव बजाज, बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्सचे एमडी आणि सीईओ श्री तपन सिंघल यांनी पुणे शहराचे पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम आणि प्रसिद्ध अभिनेत्री श्रीमती राधिका आपटे यांच्या उपस्थितीत सुरक्षित वाहन चालविण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करणाऱ्या या होर्डिंगचे अनावरण केले.

नवीन ब्रँड ओळखीबाबत बोलताना बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्सचे अध्यक्ष श्री संजीव बजाज म्हणाले, “ग्राहक केंद्री वीमा कंपनी ही ओळख निर्माण होण्याच्या दिशेने बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्सची आम्ही बांधणी करत आहोत.

आमच्यासाठी ग्राहक केंद्रीतता म्हणजे केवळ सेवा नसून काम करण्याचा मार्ग आहे. ‘Caringly yours’ या नव्या ब्रँड ओळखीद्वारे आम्ही केवळ या संदेश पुन्हा सांगत नसून तो वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवत आहोत.”

कंपनीचे नवीन ब्रँड वैशिष्ट्य सांगताना बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्सचे एमडी आणि सीईओ तपन सिंघल म्हणाले, “बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्समध्ये आमची भूमिका हीच असते की जमेल त्या पद्धतीने नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करणे आणि जिथे गरज असेल तिथे त्यांच्यासोबत असणे. मी हे पाहिले आहे की, छोटीशी गोष्टही लोकांच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणू शकते जसे की, हेल्मेट घालणे महत्त्वाचे मानले जात नाही मात्र त्यातील निष्काळजीपणा जीवावर बेतू शकतो. आम्ही लोक आणि त्यांच्या सुरक्षेची काळजी करतो आणि त्यामुळे आम्हाला असे वाटले की आमच्या नव्या ब्रँड ओळखीच्या अनावरण प्रसंगी हेल्मेट घालण्याचे महत्त्व आम्ही अधिक जोर देऊन लोकांपर्यंत पोहोचवावे. पुणे जिथे आमचे मुख्यालय आहे तिथे आणि असे शहर जिथे दुचाकी चालविणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे तिथे हे करणे अतिशय उत्तम ठरेल असे वाटून आम्ही इथे हा कार्यक्रम केला.”

पुणे शहराचे पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम याप्रसंगी बोलताना म्हणाले, “देशातील सर्वाधिक दुचाकी पुण्यात आहेत आणि रस्ते अपघाला बळी पडणाऱ्या सर्वाधिक व्यक्ती देखील. वाहन चालविताना हेल्मेट न घातल्याने हे प्रामुख्याने होते. रस्ते सुरक्षेसंदर्भात जनजागरूकता निर्माण करण्यासाठी बजाज अलायन्सने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे आहे पाहून अतिशय आनंद झाला.”

या उपक्रमासंदर्भात बोलताना प्रसिद्ध अभिनेत्री राधिका आपटे म्हणाली, “मी पुण्याची आहे आणि पुण्याविषयी मला प्रेम आहे. गाडी चालविताना हेल्मेट न घातल्यामुळे अनेकांनी जीव गमविल्याचे मी पुणे आणि देशात इतरत्र पाहिले आहे. वाहन चालविणे सुरक्षित व्हावे यासाठी हा उपक्रम हाती घेतल्याबद्दल मी बजाज अलायन्सचे कौतुक करते. समाजासाठी मोठ्या पातळीवर विचार करण्याची कंपनीची प्रामाणिक भावना यातून दिसून येते.”

हेल्मेटशिवाय गाडी चालविली म्हणून वाहतूक पोलिसांनी दंड ठोठावलेल्यांना बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स पुणे वाहतूक पोलिसांच्या मदतीने होर्डिंगवरील ही हेल्मेट मोफत देणार आहे. व्यक्तिशः त्यांच्या घरी जाणून हे काम केले जाणार आहे.