ह्युंदाई इलेक्ट्रॉनिक्सचा भारतीय कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स आणि होम अप्लायन्सेस बाजारात प्रवेश

172

कामगिरीच्या पहिल्या वर्षी 3% बाजार वाट्यावर लक्ष

भारतात ह्युंदाई इलेक्ट्रॉनिक्सतर्फे देऊ करण्यात येत असेलेली उत्पादन श्रेणी

पुणे : ह्युंदाई इलेक्ट्रॉनिक्सने भारतीय बाजारात स्मार्ट एलईडी, एअर कंडीशनर्स, वॉशिंग मशीन्स आणि रेफ्रिजरेटर्स अशा वैविध्यपूर्ण इलेक्ट्रॉनिक्स आणि होम अप्लायन्सेसची श्रेणी दाखल केली आहे.

सुलभता आणि कनेक्टिव्हीटीला चालना देण्याच्या दृष्टिने ह्युंदाई इलेक्ट्रॉनिक्सने अत्याधुनिक तंत्रज्ञान जसे की आर्टीफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग वैशिष्टयाचा अंतर्भाव नव्याने डिझाईन केलेल्या उपकरणांत केला आला. स्मार्ट टिव्ही इमेजिंग, आर्टीफिशियल इंटेलिजन्स, प्रोडक्ट मॉनिटरिंग आणि टेक्नोलॉजी इंफॉरमेटीक्समधील प्रणेते व मात्तबर असलेल्या कंपनीचे लक्ष्य भारतातीन बाजार संशोधन आणि प्रतिभा संपादनावर आहे.

या प्रसंगी बोलताना ह्युंदाई इलेक्ट्रॉनिक्सचे सोईओ श्री अक्षय धूत म्हणाले की, “घराघरांत सोपे-सुलभ प्रगत तंत्रज्ञान पोहोचवण्याचे उदिष्टय आम्ही ठेवले असून आम्ही भारतात ह्युंदाई इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेसची बहुविध श्रेणी घेऊन दाखल झालो आहोत. भारत ही एक प्रमुख उदयोन्मुख बाजारपेठ असून ग्राहकोपयोगी वस्तूंची बाजारात मोठी मागणी दिसते. आमच्या प्रवेशासोबतच, आम्ही भारतीय ग्राहकांना स्मार्ट गुड्स टेक्नोलॉजी आणि वैविध्यपूर्ण उत्पादन पद्धतींनी आजच्या काळाला अनुरूप उपकरणे उपलब्ध करून देण्याकरिता वचनबद्ध आहोत. आम्ही ग्राहकांना चांगले जाणण्याचे उद्दिष्ट ठेवल्याने त्यांच्या गरजेनुरूप उत्पादने पुरवण्याकडेच आमचा मुख्य कल राहणार आहे. त्यांना समृद्ध, अनुभव देण्याच्या दृष्टिने अधिक अर्थवाही उत्पादने देण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील राहणार आहोत.

यावेळी ह्युंदाई इलेक्ट्रॉनिक्सचे सीओओ श्री अभिषेक मालपाणी म्हणाले की, “ह्युंदाई इलेक्ट्रॉनिक्स नेहमीच आज ज्या पद्धतीने लोक काम करतात, खेळतात आणि राहत आहेत त्यात आमूलाग्र बदल आणण्यासाठी कार्यरत आहे. यंदा आम्ही आणखी एक पाऊल पुढे उचलून भारतीय बाजारपेठेत आमच्या वैविध्यपूर्ण उत्पादनांच्या साथीने ठसा उमटविण्याचा विचार केला आहे. ही उत्पादने कल्पकतेची साक्षच पटवून देईल आणि पुन्हा एकदा ह्युंदाईची तज्ज्ञता सिद्ध होईल. भारतीय बाजारासाठी आधिकाधिक स्मार्ट उत्पादने निर्माण करण्यासाठी आम्ही कायमच प्रतिबद्द आहोत.”

एलईडीज : तुमच्या टीव्हीला विचार करू दे: ह्युंदाई एलईडी हे एआय तंत्राने परिपूर्ण आहेत. ग्राहकांना त्यांच्या मोबाईलमध्ये बोलून टीव्हीची विविध कार्ये नियंत्रित करता येऊ शकतात आणि अतिशय सुलभतेने विविध बाबी शोधून त्या लावता येऊ शकतात. हे टीव्ही केवळ एका ठराविक आवाजाच्या आदेशानुसार काम करत नाहीत तर शोधाचा परिणाम देण्यापूर्वी ते विचारलेल्या शंकेचा अर्थ समजून घेतात. टीव्ही केवळ ऐकून उत्तर देत नाही तर तो ऐकतो, विचार करतो आणि मग उत्तर देतो. ऑपरेटिंग सिस्टम (ओएस) च्या सोबतीने एआयचे कार्य चालत असल्याने टीव्हीचे सर्व प्रकारचे नियंत्रण, कार्यक्रम आणि ऑनलाईन विषय अतिशय सुलभतेने करण्याचे काम तुमच्या आवाजाद्वारे नियंत्रित केल्या जाणाऱ्या मोबाईल अॅपच्या माध्यमातून होते. ह्युंदाई इलेक्ट्रॉनिक्स एलईडी श्रेणीतील 11 प्रकार बाजारात उतरवणार आहेत.

रेफ्रिजरेटर : ह्युंदाई इलेक्ट्रॉनिक्सने भारतातील सर्वच घरांसाठी योग्य ठरेल अशा रेफ्रिजरेटर्सची बुद्धिमान श्रेणी बाजारात उतरवली आहे. तंत्रज्ञान आणि सौंदर्य अशा दोन्ही बाबींवर ह्युंदाई इलेक्ट्रॉनिक्सचे विशेष लक्ष असल्याने विविध प्रकारच्या खाद्य पदार्थांच्या दृष्टीने हे उत्पादन उर्जा कार्यक्षमतेने आणि हुशार कार्यक्षमतेच्या वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहे.

वॉशिंग मशीन्स : कपडे धुण्याची जास्त क्षमता असणारी वॉशिंग मशीन्स ह्युंदाई इलेक्ट्रॉनिक्सने बाजारात आणली आहेत.  यामुळे एकाच वेळी कपड्यांचा मोठा ढीगच तुम्ही धुवायला टाकू शकता. वॉशिंग मशीन्स श्रेणीमध्ये पूर्णपणे स्वयंचलित आणि अर्ध स्वयंचलित मशीन्सचा समावेश आहे. ग्राहकांना आता कपड्याच्या प्रकारानुसार सुयोग्य अशा वॉश प्रोग्रामची निवड करता येते. यामुळे स्वच्छतेच्या बाबतीत कोणतीही तडजोड न करता विविध प्रकारचे कापड धुण्यासाठी आवश्यक असणारी निरनिराळी पद्धत आपण वापरू शकतो. या प्रकारामुळे पाण्याची देखील बचत होते.

एअर कंडीशनर्स : भारतात ह्युंदाई इलेक्ट्रॉनिक्सने केवळ स्मार्टच नाहीत तर बुद्धिमान असणारी उत्पादने आणली आहेत.  ह्युंदाईच्या एअर कंडीशनर्सची श्रेणी तुमच्या घरात तुम्हाला आरामदायी व स्मार्ट वातावरण मिळावे यासाठी बाहेरील परिस्थिती आणि दमटपणा समजून घेते. या कोरियन तंत्रज्ञान  असणाऱ्या शांत आणि दणकट उत्पादने तुम्हाला अतिशय उष्णता असणाऱ्या परिस्थितीतही शक्तिशाली कार्यप्रदर्शनाची खात्री देतात. ही बुद्धिमान एअर कंडीशनर्सची श्रेणी तुम्हाला गारवा देणारा उत्तम भागीदार असल्याची ग्वाही देते.